जिल्ह्यात तीन लाखांची दारु जप्त

राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

सातारा – लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून राज्य उत्पादन शुलक विभागाच्या पथकाकडून मद्य विक्रीचे 36 गुन्हे नोंद केले आहेत. या गुन्हयात 36 लोकांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 6 हजार 137 लिटर अवैध दारू जप्त करण्यात आली आहे. तसेच गुन्ह्यात चार वाहनांसह एकूण 3 लाख 51 हजार 106 रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती राज्य उत्पादन शुलक विभागाच्या अधिक्षक स्नेहलता श्रीकर यांनी दिली.

निवडणूक कालावधीत सिमेवर नाकाबंदी, वाहन तपासणी, रात्र गस्त करीता चार विशेष गस्ती पथकाची निर्मिती केली आहे.हे गस्ती पथक सातारा-मेढा-केळघर-कुडाळ-कुंभगाव-पाचवड-वाई-सुरुर-वेळे-खंडाळा-लोहोम-शिरवळ-शिंदेवाडी, सातारा-आदर्किफाटा-फलटण-बरड-राजुरी-सांगवी-साखरवाडी-लोणंद-शिरवळ-वाठार स्टेशन-कोरेगांव, सातारा- उंब्रज-पाटण-कोयनानगर-ढेबेवाडी-तळमावले-कोळेवाडी-ओंड – उंडाळे- ऐनपे, खिंड-कराड-रहिमतपूर-औंध.सातारा-कोरेगांव-पुसेगांव-पिंगळी-दहिवडी-शिंगणापूर -मार्डी- म्हसवड-मायणी यामार्गावर अहोरात्र गस्त घालुन गुनहे नोंदविण्याची कारवाई सुरु आहे. या गस्ती पथकामार्फत अवैध मद्याची निर्मिती, वाहतूक, विक्रीवर प्रभावीपणे नियंत्रण ठेवून गुन्हा अन्वेषाचे काम केले जात आहे. तसेच अवैध हातभट्टी निर्मिती केंद्रांवर वारंवार छापे टाकून गुन्हे नोंदविण्याचे काम सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)