सेलूजवळील अपघातात तीन ठार

सेलू: सेलूजवळील कवडधन पाटी येथे शनिवारी (दि.29) मध्यरात्री दीड वाजता स्कॉर्पिओ व दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात तीन जण जागीच ठार झाले आहे. अन्य एक गंभीर जखमी असून त्याला उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सिद्धार्थ मगर (वय 28), अविनाश मकासरे (30), सिद्धार्थ दवंडे (30) असे ठार झालेल्यांची नावे आहेत. तर कुलदीप आसाराम पंडागळे (30) हा गंभीर जखमी झाला. सेलू तालुक्‍यातील ढेंगळी पिंपळगाव येथील चार तरुण दुचाकीवरून सेलू येथील श्री. केशवराज बाबासाहेब महाराज यांच्या यात्रेसाठी गेले होते. यात्रेवरून परतताना ढेंगळी पिंपळगाव येथे स्कॉर्पिओ व दुचाकीची समोरासमोर धडक झाली. यात दुचाकीवरील चौघां पैकी तीन जण जागीच ठार झाले. अपघातानंतर स्कॉर्पिओ गाडीतील बलून उघडल्याने आतमधील नागरिकांना फारशी इजा झाली नाही. घटनेची माहिती मिळताच सेलू पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)