अमृतसरमध्ये ‘निरंकारी भवना’वर ग्रेनेड हल्ला; 3 जणांचा मृत्यू तर 10 जण जखमी

नवी दिल्ली – पंजाबमधील अमृतसर येथील ‘निरंकारी भवना’वर 2 अज्ञात लोकांनी ग्रेनेड हल्ला केला आहे. या हल्ल्यामध्ये 3 जणांचा मृत्यू झाला आहे तर 10 पेक्षा अधिक लोक जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, ‘निरंकारी भवना’वर 2 अज्ञात लोकांनी ग्रेनेड फेकले आणि ते फरार झाले. आरोपी हे मोटारसायकलवरून आले होते. ‘निरंकारी भवना’मध्ये प्रत्येका रविवारी धार्मिक सभा घेतली जाते, ज्यामध्ये आसपासच्या परिसरातील ग्रामीण तसेच शहरी भागातून लोक येत असतात.

-Ads-

हल्लेखोरांनी पूर्ण पडताळणी करून रविवारचा दिवस निवडल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान या हल्ल्यामागे कोणाचा हात आहे हे स्पष्ट झाले नाही. यामागे दहशतवादी संघटनेचा हात असल्याचाही अंदाज व्यक्त केला जात आहे. सध्या पोलिस याप्रकरणी तपास करत असून या भागातील सीसीटीव्ही फुटेज गोळा करत आहे. घटनास्थळी फाॅरेसिक टीमही दाखल झाली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)