नवी दिल्ली- अतिरेक्यांना पैसे पुरविल्याच्या प्रकरणात अटकेत असलेल्या शब्बीर शहा, असिया अंद्राबी आणि आलम भट या तीन फुटीरतावाद्यांना न्यायालयाने 12 जुलै पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
2008 साली मुंबई येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्याचा मास्टर माईंड हाफिझ सईदच्या जमात उद दावाला पैसे पुरवल्याच्या आरोपात एनआयएने या तीन फुटिरतावाद्यांना अटक केली होती. या प्रकरणी आतापर्यंत ते एनआयएच्या ताब्यात होते. मात्र, आज (शुक्रवार दि. 14) झालेल्या सुनावणीत एनाआयएने त्यांच्या कोठडीची मागणी न केल्याने विशेष न्यायधीश राकेश स्याएल यांनी त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. एनाआयएने या तीघांना मागिल वर्षी 4 जुलै रोजी अटक केले होते.
त्यानंतर त्यांच्याकडून या प्रकरणी चौकशी केली जात होती. त्यातील शहा आणि अंद्राबी हे पहिल्यापासुनच एनाआयएच्या ताब्यात होते. मात्र, आलम भटला काश्मिर येथून या प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी दिल्ली येथे आणण्यात आले आहे.