तेलंगाणात 3 कोटींची रोकड जप्त

हैद्राबाद: तेलंगाणा राज्यात विधानसभा निवडणूकीच्या पूर्वसंध्येला निवडणूक आयोग आणि वारंगल जिल्हा प्रशासनाच्या संयुक्‍त कारवाईत 3 कोटी रुपयांहून अधिक रोकड जप्त करण्यात आली आहे. विधानसभा निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर करण्यात आलेल्या नाकाबंदीत एका वाहनाची तपासणी केली असता पोलिसांना ही रक्‍कम आढळून आली आहे. ही रक्‍कम मतदारांना वाटण्यासाठी आणण्यात आली असावी, अशी शक्‍यता पोलिसांनी वर्तविली आहे.

वारंगल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक व्ही. रविंद्र म्हणाले, वर्धानापेट विधानसभा मतदार संघात एका वाहनातून कोटयवधीची रोख रक्‍कम घेवून जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानंतर नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करण्यात येत होती. यावेळी एका वाहनात 3 कोटींहून अधिक रोख रक्‍कम आढळली. ही रोख रक्‍कम तेलंगाणा जन समितिचे उमेदवार पी. देवैया यांची असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून निवडणूक आयोगांच्या अधिका-यांना माहिती देण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले.

-Ads-

दरम्यान, तेलंगाणात शुक्रवारी विधानसभा निवडणूकीसाठी मतदान होणार आहे. याची निवडणूक आयोगाकडून संपूर्ण तयारी करण्यात आली आहे. तसेच हैद्राबादसह राज्यातील संवेदनशील भागात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)