क्रिकेट रसिकासाठी ‘रविवारी’ तीन सामन्यांची मेजवानी

नवी दिल्ली – रविवारी क्रिकेट रसिकासाठी तीन सामन्यांची मेजवानी आहे. कारण रविवारी तीन आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने वेगवेगळ्या ठिकाणी रंगणार आहेत. यामध्ये दोन टी-20 आणि एक एकदिवसीय क्रिकेट सामन्यांचा समावेश आहे.

आॅस्ट्रेलिया वि. दक्षिण आफ्रिका (पहिला एकदिवसीय सामना)

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दक्षिण आफ्रिकेचा संघ हा आॅस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. दक्षिण आफ्रिका आणि आॅस्ट्रेलिया यांच्यात तीन एकदिवसीय सामन्याची मालिका उद्यापासून सुरू होणार असून रविवारी आॅस्ट्रेलियातील पर्थ येथील पर्थ स्टेडियमवर सकाळी 8.50 वाजता पहिला सामना रंगणार आहे. दुसरा सामना शुक्रवारी आणि तिसरा सामना रविवारी होणार आहे.

 

भारत वि. वेस्टइंडीज (पहिला टी-20 सामना)

दुसरीकडे भारत दौऱ्यावर वेस्ट इंडीजचा संघ आहे. कसोटी आणि एकदिवसीय मालिकेत पराभव झाल्यानंतर आता टी-20 क्रिकेट मालिकेत विजय मिळविण्याचा प्रयत्न वेस्टइडींज संघाचा असेल. भारत वि वेस्टइंडीज तीन टी-20 सामन्याची मालिका रविवार पासून सुरू होत आहे. या मालिकेतील सामना रविवारी कोलकत्ता येथील ईडन गार्डनवर संध्याकाळी 7 वाजता रंगणार आहे. कसोटी आणि एकदिवसीय मालिकेत विजय मिळविल्यानंतर  टी-20 मालिका जिंकण्याचाही भारतीय संघाचा निर्धार असेल.

न्यूझीलंड वि. पाकिस्तान (तिसरा टी-20 सामना)

तर न्यूझीलंडचा संघ संयुक्त अरब अमीरात दौऱ्यावर आहे. पाकिस्तान वि. न्यूझीलंड तीन टी-20 सामन्याच्या मालिकेत पाकिस्तानने 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. या मालिकेतीत अखेरचा सामना रविवारी दुबई येथील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम होणार आहे. अखेरच्या सामन्यात विजय मिळविण्याचा न्यूझीलंड संघाचा प्रयत्न असेल तर पाकिस्तान तिसरा सामना जिंकून 3-0 ने मालिका जिंकण्याच्या प्रयत्नात असणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)