भेसळयुक्‍त साडेतीन हजार किलो खवा जप्त

पोलीस, अन्न व औषध प्रशासनाची संयुक्‍त कारवाई

पुणे – गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेला आहे. तर, याच दरम्यान गुजरातमधून पाठवलेला साडेतीन हजार किलो खवा गुन्हे शाखेने जप्त केला आहे. या कारवाईसाठी अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांची मदत घेण्यात आली. या प्रकरणी आराम बसच्या चालकासह एकाविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सहकारनगर, धनकवडी भागात गुन्हे शाखेचे पोलीस नाईक सचिन जाधव गस्त घालत होते. घरफोडी करणाऱ्या चोरट्यांचा वावर या भागात असल्याची माहिती त्यांना मिळाली होती. त्यावेळी पद्मावतीजवळ खासगी आराम बसमधून भेसळ केलेला बनावट खवा विक्रीसाठी पुण्यात पाठविल्याची माहिती जाधव यांना मिळाली. खातरजमा केल्यानंतर अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांना या बाबतची माहिती पोलीस उपनिरीक्षक हर्षल कदम यांनी दिली.

या बसच्या थांब्याजवळ पोलिसांनी सापळा लावला. अन्न व औषध प्रशासन विभागातील अधिकारी प्रशांत गुंजाळ, कुलकर्णी, स्वाती म्हस्के तेथे आले. गो-गंगा, भाग्यलक्ष्मी, वीरकृपा या खासगी प्रवासी वाहतूक करणाजया बसमधून आलेला 3,500 किलो खवा जप्त करण्यात आला. या प्रवासी करणाऱ्या कंपनीचा बसचालक तसेच बनावट खवा घेऊन आलेला भावेश पटेल यांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, सहायक आयुक्त समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक रघुनाथ जाधव, उपनिरीक्षक हर्षल कदम, दिनेश पाटील, सचिन जाधव, इरफान मोमीन, श्रीकांत वाघवले, तुषार माळवदकर, रिजवान जिनेडी, तुषार खडके, गजानन सोनुने यांनी ही कारवाई केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)