सलमान खानला ठार मारण्याची धमकी दिल्याबद्दल पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे. या व्यक्तीचे नाव शाहरुख गुलामनबी उर्फ शेरा असे आहे. या शाहरुख गुलामनबी उर्फ शेराला बॉलिवूडमध्ये हिरो बनायचे होते. त्यासाठी सलमानने त्याला मदत करावी. त्याचे गॉडफादर बनावे अशी त्याची अपेक्षा होती. त्यासाठी त्याने 6 ऑक्टोबरला सलमानच्या स्वीय सहायकाला फोन केला आणि सलमानचा मोबाईल नंबर मागितला. मात्र सलमानच्या सहायकाने नंबर देण्यास नकार दिल्यावर या शेराने फोनवरून सलमानला शिवीगाळ करायला सुरुवात केली.
सलमानला ठार मारण्याची धमकीही दिली. त्यानंतर 13 नोव्हेंबरला त्याने सलमानचे वडील सलीम खान यांनाही फोन केला. त्यांच्याकडेही त्याने सलमानचा फोन नंबर मागितला. आपण गॅंगस्टर छोटा शकिलच्या गॅंगमधून बोलत असल्याचे त्याने भासवले. सलीम खान यांनीही सलमानचा नंबर देण्यास नकार दिल्यावर शेराने पुन्हा शिवीगाळ आणि धमकी दिली. या सगळ्या प्रकरणाची तक्रार बांद्रा पोलिसांकडे केल्यावर अलाहबादमधून या शेराला अटक करण्यात आली आहे. गमतीची गोष्ट म्हणजे सलमानच्या बॉडीगार्डचेही नाव शेरा आहे. तो सलमानचा अगदी जवळचा समजला जातो.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा