“कॉसमॉस’प्रकरणाचे धागे पुणे, मुंबई, कोल्हापुरात

एटीएमचा वापर: तपास यंत्रणांनी तयार केली केंद्रांची यादी

पुणे- कॉसमॉस बॅंकेचा पेमेंन्ट सर्व्हर हॅक करुन सुमारे 94 कोटी 42 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. यामध्ये 28 देशात 12 हजार ट्रान्झॅक्‍शनचा प्रत्यक्ष एटीएम सेंटरमध्ये वापर करुन सुमारे 76 कोटी रुपये लंपास करण्यात आले आहेत. तर, भारतात केलेल्या अडीच हजार ट्रान्झॅक्‍शनमध्ये कोल्हापूर, पुणे, मुंबई, हैद्राबाद, इंदौरसह देशभरातील महत्त्वाच्या शहरांतील एटीएमचा वापर पैसे काढण्यासाठी केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.

-Ads-

पुण्यातील चांदणी चौक, नरपतगीरी चौक येथील एटीएम केंद्रांच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये काही संशयित व्यक्‍ती घटनेच्या दिवशी पैसे काढताना दिसून आले आहेत. याप्रकरणी संबंधित एटीएम सेंटरची यादी तयार करुन तेथील सीसीटीव्ही फुटेज मिळविण्यासाठी तपास यंत्रणा प्रयत्नशील झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. कॉसमॉस बॅंकेवर झालेल्या सायबर हल्ल्यात मोठी रक्कम लंपास झाल्याने पोलीसमोरील गुन्ह्याची व्याप्ती तब्बल 28 देशांमध्ये असल्याने पोलिसांपुढे तपासाचे आव्हान निर्माण झाले आहे. यासंदर्भात सायबर क्राइम सेल अधिकाऱ्यांनी शुक्रवारी कॉसमॉस बॅंकेच्या मुख्यालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून महत्त्वपूर्ण कागदपत्रे ताब्यात घेतली. गुन्ह्यावेळी नेमकी कोठून आणि किती वाजता ट्रान्झॅक्‍शन झाली, याची माहिती उपलब्ध असून त्याआधारे आरोपींचा माग काढता येईल का? याबाबत पोलीस चाचपणी करत आहे. या तपासासाठी पोलिसांनी खासगी सायबर तज्ज्ञांची मदत घेतली असून गुन्हा नेमका कसा घडला आणि सर्व्हर कसा हॅक झाला, या तपासासाठी बॅंकेनेही परदेशी फॉरेन्सिक तपास यंत्रणेस पाचारण केले आहे.

सोमवारपासून सर्व सेवा सुरळीत
सायबर दरोड्याच्या घटनेनंतर बॅंकेने सुरक्षेच्या दृष्टीने बॅंकेचे एटीएम, डेबिट कार्ड, मोबाइल बॅंकिंग, इंटरनेट बॅंकिंग सुविधा हे व्यवहार बंद ठेवले आहे. नवीन पेमेंट सर्व्हरची यशस्वी चाचपणी झाल्यावर संबंधित सुविधा सुरू करण्यात येतील, असे बॅंक अधिकाऱ्यांनी सांगितले होते. त्यानुसार, सोमवारपासून या सेवा पूर्ववत सुरू करण्यास प्रारंभ करण्यात येईल, असे बॅंकेचे अध्यक्ष मिलिंद काळे यांनी सांगितले.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)