शहांची उमेदवारी दाखल करताना उद्धव ठाकरे राहणार उपस्थित

नवी दिल्ली – प्रथमच लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यास सज्ज झालेले भाजपचे अध्यक्ष अमित शहा उद्या (शनिवार) उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यावेळी त्यांच्यासमवेत भाजपच्या बड्या नेत्यांबरोबरच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेही उपस्थित राहणार आहेत.

गुजरातच्या गांधीनगर लोकसभा मतदारसंघातूून शहा निवडणूक लढवणार आहेत. त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएकडून जोरदार शक्तिप्रदर्शन केले जाणार आहे. अर्ज दाखल करताना शहा यांच्या समवेत भाजपच्या वतीने राजनाथ सिंह आणि नितीन गडकरी हे केंद्रीय मंत्री उपस्थित राहतील. त्याशिवाय, उद्धव यांच्याबरोबरच शिरोमणी अकाली दलाचे नेते प्रकाशसिंग बादल आणि लोक जनशक्ती पक्षाचे प्रमुख रामविलास पासवान यांची उपस्थितीही लक्षवेधी ठरणार आहे. एनडीएच्या घटक पक्षांच्या नेत्यांच्या उपस्थितीतून ऐक्‍याचे दर्शन घडवले जाणार आहे. त्याशिवाय, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर शहा हे एनडीएचे दुसऱ्या क्रमांकाचे शक्तिशाली नेते असल्याच्या बाबीवरही शिक्कामोर्तब होणार आहे.

अर्ज दाखल करण्यापूर्वी शहा यांचा रोड शो होईल. त्यात उद्धव आणि इतर नेते सहभागी होणार आहेत. शहा यांचा ताफा जाईल तेव्हा संबंधित मार्गावर भाजपचे कार्यकर्ते मानवी साखळी तयार करतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)