यशवंत सहकारी बॅंकेत पाऊण कोटींचा दरोडा

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातल्या पन्हाळा तालुक्‍यातील कळे इथं अज्ञात चोरट्यांच्या टोळीकडून यशवंत सहकारी बॅंकेवर मध्यरात्री पाऊण कोटींचा दरोडा टाकण्यात आला आहे. बॅंकेत चोरांनी गॅस कटरच्या मदतीने लॉकर तोडून रोख रक्‍कम आणि सोन्याचे दागिने असा सुमारे 75 ते 80 लाखांचा ऐवज लुटला.

ही चोरीची घटना शुक्रवारी उघडकीस आली. कोल्हापुरातील गुजरीत झालेल्या चोरीच्या घटनेनंतर अवघ्या काही तासांत कोल्हापूरपासून काही अंतरावर कळे इथल्या मध्यवर्ती चौकात बॅंकेवर दरोडा पडल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. यामध्ये चोरांनी मोठी रक्‍कम आणि तारण ठेवलेल्या सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारला आहे. या घटनेमुळे व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली असून ठसेतज्ञ आणि श्वान पथकाच्या मदतीने या घटनेचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. बॅंकेतून अद्याप किती रोख रक्कम आणि किती सोन्याचे दाग दागिने चोरीस गेलेत याची पडताळणी बॅंकेचे वरिष्ठ अधिकारी करित आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)