बांगला देशात निवडणुकीपूर्वी विरोधी पक्षाच्या हजारो कार्यकर्त्यांना अटक

ढाका (बांगला देश): बांगला देशात निवडणुकीपूर्वी विरोधी पक्षाच्या हजारो कार्यकर्त्यांना अटक करण्यात आल्याचे वृत्त आहे. 30 तारखेला होणाऱ्या निवडणुकीपूर्वी विरोधी पक्षाच्या 10,500 पेक्षाही अधिक कार्यकर्त्यांना पोलीसांनी अटक केल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे.

रविवारी अमेरिकेने शेख हसीना सरकारला स्वतंत्र निवडणूक सुनिश्‍चित करण्याचा आग्रह केला होता, त्यानंतर अटक केलेल्यांची संख्या जाहीर करण्यात आली आहे. निवडणुकीत दहशत निर्माण करण्याच्या हेतूने हे अटकसत्र करण्यात आल्याचा विरोधी पक्षांचा दावा आहे. मुख्य विरोधी पक्ष बीएनपीच्या (बांगला नॅशनलिस्ट पार्टी) नेत्या खालिदा झिया तुरुंगात 17 वर्षांची शिक्षा भोगत आहेत. त्यांच्या पक्षाच्या 7021 कार्यकर्त्यांना आणि त्यांच्या सहयोगी जमात-ए-इस्लामीच्या 3,500 कार्यकर्त्यांना अटक करण्यात आलेली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

जमात-ए-इस्लामीला निवडणूक लढवण्यास बंदी घालण्यात आलेली आहे. मात्र त्यांचे उमेदवार बीएनपीसोबत अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहेत. दररोज आपल्या 80 ते 90 कार्यकर्त्यांना अटक होत असल्याचा आरोप जमात-ए-इस्लामी चे महासचिव शफिकूर रहमान यांनी केला आहे. हे अटकसत्र भीतीचे वातावरण निर्माण करण्यासाठी केले जात आहे, असा त्यांनी आरोप केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)