शरद कृषी प्रदर्शनाला हजारो शेतकऱ्यांची उपस्थिती

जातिवंत जनावरांच्या स्पर्धेत विविध प्रकारच्या जनावरांचा सहभाग

लोणंद – लोणंद येथे सुरू असलेल्या शरद कृषी महोत्सवाचे दुसऱ्या व तिसऱ्या दिवशी हजारो शेतकरी विद्यार्थी व लोणंद व लोणंद परिसरातील नागरीकांची तोबा गर्दी झाली होती.यामध्ये जिल्हातील अनेक कृषीप्रेमीनी सहभाग घेतला आहे .लोणंद येथे सुवर्णगाथा उत्सव समिती , साद सोशल ग्रुप श्रीमंत रामराजे प्रतिष्ठात , जननायक मकरंद पाटील विचार मंच , कृषी व पशुसंवर्धन विभाग जिल्हा परिषद सातारा यांच्या वतीने शरद कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शिक्षण विभाग पंचायत समिती खंडाळा यांच्या माध्यमातून जिल्हा परिषद शांळच्या मुला मुलीचे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सध्य स्थितीवर शेतकऱ्याच्या कृषी गीते भावगीते धनगरी नृत्य सादर करून उपस्थिताचे मने जिंकली.एक टन वजनाच्या वळू सोबत फोटो काढण्यासाठी प्रेक्षकांची मोठी गर्दी पाहवयास मिळत आहे. तसेच बाराशे किलो वजनाचा हिरा नावाच्या रेडयाला पाहण्यासाठी गर्दी होत आहे .प्रदर्शनात सात लाखांचा बोर जातीचा बोकड पाहावयास मिळत आहे. शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञानाने सज्ज शेती अवजारे सेद्रिय खते नवनवीन बी बीयाणे नर्सरी विविध प्रकारची फुले झाडे व फळझाडाविषयी उपयुक्त माहिती या प्रदर्शनातू मिळत आहे. शेती वाहनांबरोबरच विविध कंपन्याच्या मोटारसायकल व कार कंपनीने आपले स्टॉल उभे केले आहेत.

जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या जातीवंत जनावराच्या स्पर्धत म्हैस मादी गटामध्ये फरीद जाफर शेख प्रथम क्रमांक,अजित विठ्ठल सणस दुसरा क्रमांक,लक्ष्मण कृष्णा गाडे तृतीय क्रमांक, तर गीर गाय स्पर्धत दादासो सीताराम धायगुडे प्रथम क्रमांक, विद्या रामदास कुंडलकर दुसरा क्रमांक, तर रेडा गट स्पर्धत दत्तात्रय विक्रम चौगुले प्रथम क्रमांक,पप्पू दादासाहेब देवकाते दुसरा क्रमांक, तसेच संकरित गाय एक वर्षाखालील स्पर्धत संदीप लक्ष्मण कुंडलकर प्रथम क्रमांक,संजय मानसिंग घाडगे दुसरा क्रमांक,संदीप लक्ष्मण कुंडलकर,तिसरा क्रमांक, तर संकरित गाय गट स्पर्धत अजित संजीवन शेडगे प्रथम क्रमांक,वीरेंद्र शहाजी गाढवे व संजय मानसिंग गाढवे दुसरा क्रमांक,बाळकृष्ण रामचंद्र नाळे तिसरा क्रमांक, तर तीन वर्षावरील संकरित गाय स्पर्धत सतीश दिनकर डोंबळे प्रथम क्रमांक,प्रवीण सोपन मतकर दुसरा क्रमांक,सुशील सुरेश गाढवे तिसरा क्रमांक, तसेच एक वर्षांखालील खिलार गाय गट स्पर्धत धीरज रामचंद्र गायकवाड प्रथम क्रमांक,रमेश शंकर गोरे दुसरा क्रमांक,विकास राजेंद्र लावंड तिसरा क्रमांक, तर एक व तीन वर्षामधील खिल्लार गाय गट स्पर्धत गणेश रमेश गोरे प्रथम क्रमांक,नासिर इकबाल शेख व महेश बजरंग भोसले दुसरा क्रमांक, दत्तात्रय बबन नेवसे तिसरा क्रमांक, तर तीन वर्षावरील खिल्लार गाय स्पधेत विशाल शंकर नलावडे प्रथम क्रमांक,तानाजी शिवाजी कदम दुसरा क्रमांक,विष्णू कृष्णा चव्हाण तिसरा क्रमांक तसेच खिलार खोन्ड स्पर्धत सुविनय विजय सुतार प्रथम क्रमांक,प्रकाश हनुमंत काटकर दुसरा क्रमांक,महिंद्रा रामचंद्र शिंगटे तिसरा क्रमांक, तर अश्व गट स्पर्धतअमोल पोपट जाधव प्रथम क्रमांक, संतोष पोपट ठोंबरे दुसरा क्रमांक, तर खिलार खोंड कोसा स्पर्धत सुरज लक्ष्मण ढोकळे प्रथम क्रमांक, शुभम विठ्ठल शिंदे दुसरा क्रमांक, मानवेश प्रसाद जाधव तिसरा क्रमांक, तर खिलार गट सहा वर्षा पुढील स्पर्धत प्रवीण महादेव राक्षे प्रथम क्रमांक,विष्णू रितकर वाडकर दुसरा क्रमांक, तर खिलार खोंड चौसा गट स्पर्धत प्रभाकर विठ्ठल जाधव प्रथम क्रमांक,प्रसाद दत्तत्रय पवार दुसरा क्रमांक,नवनाथ सुभाष करे तिसरा क्रमांक,तर खिलार खोंड दुसा स्पर्धत उत्कर्ष रवींद्र शिंगटे प्रथम क्रमांक,संभाजी रामचंद्र घोरपडे दुसरा क्रमांक,किरण संपत जगदाळे तिसरा क्रमांक, असे क्रमांक शेतकयानी मिळवले आहेत अशी माहिती पशुसंवर्धन अधिकारी डॉ विनोद पवार व डॉ गणेश नेवसे यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)