जिल्ह्यातील हजारो कुटुंबांना मिळणार घरकुल? 

सरकारी जागा देण्याचा शासनाचा निर्णय; अंमलबजावणीतील त्रुटी दूर करणे ठरणार महत्त्वाचे 

नीरा: गरीब, गरजू व बेघर कुटुंबांना घरकुल योजनेसाठी सरकारी जमीन विनामूल्य उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेत जागे अभावी घरकूल योजनेपासून वंचित राहिलेल्या कुटुंबांना शासनाने दिलासा दिला आहे. यामुळे जिल्ह्यातील हजारो कुटुंबांना घरकुल मिळणार आहे. अतिक्रमित जागा घरकुल बांधण्यासाठी योग्य असल्यास, अशी जागाही विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येणार असल्याने शासकीय अधिकारी तसेच गावातील राजकारणाचे बळी ठरणाऱ्या कुटुंबांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

जिल्ह्यात 23 हजार 330 प्रधानमंत्री आवास योजनेसाठी निवडण्यात आले. यापैकी 9349 जणांकडे स्वमालकीची जागा होती. मात्र, 13981 लाभार्थ्यांकडे स्वतःची जागा नसल्याने घरकुल योजनाच बारगळली होती. स्वतःची जागा नसलेल्या लाभार्थ्यांपैकी हजारो कुटुंबे अतिक्रमणात असल्याने या योजनेच्या अंमलबजावणीबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले होते. मात्र, अशा कुटुंबाना आता दिलासा मिळाला असला तरी जागा कशी उपलब्ध करणार? हे आगामी काळातच दिसून येईल.

जिल्ह्यात स्वातंत्र्यदिनी प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांची निवड करण्यात आली. नंतर लाभार्थ्यांची यादी जाहीर करण्यात आली. परंतु, जागेच्या अभावाने घरकुल योजनाच बारगळली, त्यानंतर शासनाने पंडित दीनदयाळ उपाध्याय योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्यांला इतरत्र जागा खरेदी करण्यासाठी 50 हजार रुपयांचे अनुदान देऊ केले. मात्र, ही योजनाही अपयशी ठरली. त्यानंतर यात पुन्हा दोन वेळा सुधारणा करूनही घरकुलांच्या जागेचा प्रश्‍न सुटत नसल्याने ग्रामविकास विभागाने अखेर सरकारी जागा वाटपाचा निर्णय घेतला आहे.

स्वतःची जागा नसलेल्या, घरकुल योजनेसाठी पात्र ठरलेल्या व दीनदयाळ उपाध्याय योजनेच्या लाभासाठी पात्र असलेल्या कुटुंबाला सरकारी जागा विनामूल्य उपलब्ध करून दिली जाणार आहे. मात्र, ती जागा त्याच्या नावे होणार नसून त्यामुळे घरकुल विकणे किंवा परस्पर भाड्याने चढविण्याच्या प्रकारांना आळा बसणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)