मुंबईत 1 हजार कोटींचे ड्रग्ज जप्त, चौघांना अटक

मुंबई: नवर्वषाच्या पार्श्वभूमीवर ऍन्टी नार्कोटिक्‍स विभागाने सांताक्रूज येथे मोठी कारवाई केली आहे. या परिसरातून सुमारे 1 हजार कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे.
सलीम इस्माईल धाला, चंद्रमणी तिवारी, संदीप तिवारी आणि धनशाम रामराज सरोज अशी अटक करण्यात आलेल्या चौघा जणांची नावे आहेत. याबाबत पोलिसांना खबरींनी दिलेल्या माहितीच्या आधारावर सापळा रूचून कारवाई करण्यात आली. सलीम कॉटन ग्रीन परिसरात वाहन चालकाचे काम करतो. याआधीही गांजा बाळगल्याप्रकरणी त्याला पोलिसांनी 2013मध्ये अटक केली होती.

या कारवाईत पोलिसांनी फेंटानिल नावाचे 100 किलो ड्रग जप्त केले आहे. 25-25 किलो फेंटानिल ड्रग चार बॅगांमध्ये भरण्यात आले होते. हे ड्रग वाकोला परिसरात एका कारमध्ये सापडले आहे. देशातील आजवरची ही ड्रग्ज जप्तीची सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

संदीप तिवारी हा एका खासगी कंपनीत नोकरीला आहे. चंद्रमणी यांचे कांदिवलीतील ठाकूर विलेज परिसरात मोबाईलचे दुकान आहे. सर्व आरोपींवर अंमली पदार्थ विरोधी कायद्याअंर्तगत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)