भारतात ज्यांना असुरक्षित वाटते, त्यांना बॉम्बने उडवून दिले पाहिजे – भाजप आमदार  

नवी दिल्ली – उत्तरप्रदेशमधील मुजफ्फरनगरमधील भाजप आमदाराने वादग्रस्त वक्तव्य केले आहे. भारतात ज्यांना असुरक्षित वाटते त्यांना बॉम्बने उडवून दिले पाहिजे, असे वक्तव्य भाजप आमदार विक्रम सैनी यांनी केले आहे. मात्र, हे मत त्यांचे वैयक्तिक असल्याचेही विक्रम सैनी यांनी स्पष्ट केले आहे.

विक्रम सैनी म्हणाले कि, माझ्या मते, ज्यांना भारतात भीती वाटते किंवा असुरक्षित वाटते. त्यांना बॉम्बने उडवून दिले पाहिजे. माझ्याकडे एखादे मंत्रालय दिल्यास अशाप्रकारच्या सर्व व्यक्तींना बॉम्बने उडवून देईल, असे त्यांनी म्हंटले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच बुलंदशहरमध्ये कथित गोरक्षणावरून झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर अभिनेता नासिरुद्दीन शहा यांनी देशातील मुलांच्या मनात असुरक्षितेची भावना असल्याचे म्हंटले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)