एकमेकांचे चेहरेही न पाहणारे आता गळाभेट घेत आहेत : मोदी

प्रातिनिधिक छायाचित्र

विरोधकांवर टीकास्त्र: भ्रष्टाचारविरोधी मोहिमेमुळे त्यांच्यात घबराट

दुर्गापूर : भाजपच्या विरोधात महाआघाडी स्थापण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या विरोधकांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी जोरदार टीकास्त्र सोडले. चार वर्षांपूर्वी एकमेकांचे चेहरेही न पाहणारे आता एकमेकांची गळाभेट घेत आहेत, अशी खिल्ली त्यांनी उडवली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पश्‍चिम बंगालमध्ये झालेल्या सभांच्या माध्यमातून मोदींनी एकप्रकारे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपच्या प्रचाराचा नारळ फोडला. काही दिवसांपूर्वी कोलकत्यातील सभेत एकत्र येऊन विरोधकांनी ऐक्‍याचे दर्शन घडवले. त्यावरून मोदींनी विरोधकांवर निशाणा साधला. चिट फंडापासून ते संरक्षण व्यवहारांपर्यंत विविध माध्यमांतून पैसा मिळवणाऱ्यांना चौकीदार (स्वत: मोदी) आवडत नाही. त्यामुळे भिन्न प्रवृत्तीचे लोक कोलकत्यात एकत्र आले आणि त्यांनी मला हटवण्याची शपथ घेतली. भ्रष्टाचार आणि काळ्या पैशांपासून देश स्वच्छ करण्यासाठीची प्रचंड मोहीम चौकीदाराने हाती घेतल्याने घाबरून ते एकत्र आले, असे ते म्हणाले.

यावेळी मोदींनी पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल कॉंग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले. ममतांच्या पायाखालची जमीन सरकू लागली आहे. भाजपवरील जनतेच्या प्रेमाने त्या भयभीत झाल्या आहेत. त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांना लक्ष्य करून हिंसाचार घडवला जात आहे.

राज्यातील मागील कम्युनिस्ट सरकारांप्रमाणेच लोकशाही चिरडण्याचा मार्ग ममतांनी अवलंबला आहे, असा आरोप त्यांनी केला. यावेळी मोदींनी वादग्रस्त ठरलेल्या नागरिकत्व दुरूस्ती विधेयकाचे जोरदार समर्थन केले. त्या विधेयकामुळे धार्मिक जाच सहन करावा लागणाऱ्यांना न्याय आणि प्रतिष्ठा मिळेल. भारताशिवाय वास्तव्यासाठी जागा नसणाऱ्यांना न्याय मिळू नये का, असा सवाल त्यांनी केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)