व्यवस्थे विरोधात बोलणाऱ्यांना गुन्हेगार ठरविण्यात येतय : शोमा सेन बचाव पक्षाचा युक्तीवाद

सरकारी पक्षाचा युक्तीवाद होणार 17 ऑक्‍टोबर रोजी

पुणे: बंदी घातलेल्या माओवादी संघटनाशी संबंध असल्याच्या कारणावरून अटक केलेल्या शोमा सेन यांच्या जामिनावर शुक्रवारी बचाव पक्षाचा युक्तीवाद झाला. या प्रकरणातील अटकसत्र म्हणजे अघोषीत आणीबाणी आहे. व्यवस्थे विरूध्द बोलणाऱ्यांना सरकार गुन्हेगार ठरवत आहे. उजव्या विचारसरणीचे लोक म्हणजे प्रखर देशभक्त आणि डावे म्हणजे देशाचे तुकडे करणारे असे चित्र जाणीवपूर्वक निर्माण करण्यात येत असल्याचा युक्तीवाद करून सेन यांना जामीन देण्याची मागणी बचाव पक्षाचे वकील ऍड. राहुल देशमुख यांनी केली. यावर सरकारी पक्षातर्फे प्रमुख जिल्हा सारकारी वकील उज्व्वला येत्या बुधवारी (दि. 17 ऑक्‍टोबर) युक्तीवाद करणार आहेत. विशेष न्यायाधीश के. डी. वडणे यांच्या न्यायालयात याप्रकरणाची सुनावणी सुरू आहे.

-Ads-

भीमा कोरेगाव हिंसेबबात दाखल झालेल्या गुन्ह्यांमध्ये संभाजी भिडे, मिलिंद एकबोटे यांची नावे असताना हिंसाचाराला सेन आणि सहआरोपी कसे जबाबदार ? असा प्रश्‍न ऍड. देशमुख यांनी उपस्थित केला. या प्रकरणात प्रथमदर्शनी पुरावा म्हणून जी पत्रे जप्त केल्याचा पोलिसांचा दावा आहे, त्या पत्रातून नेमके कोणी – कोणाला पत्र पाठवले हे स्पष्ट होत नाही. केवळ पत्रात सेन यांचे नाव आल्याने तो त्यांच्यावरील आरोपांसाठी सबळ पुरावा होत नाही. पत्र पाठविणारा हा डाऊटफुल असल्याचे देशमुख यांनी न्यायालयाला सांगितले.

एल्गार परिषदेमध्ये सेन यांचा सहभाग नव्हता, त्यांनी भाषणही केले नाही, तसेच परिषदेसाठी त्यांनी निधी गोळा केल्याचा आरोपही तथ्यहीन आहे, हे त्यांच्या बॅंकेच्या आर्थिक व्यवहारांवरुनही स्पष्ट होते. शोमा सेन यांना हायपरटेन्शनचा त्रास आहे, त्यांना आर्थथायटीसचा आजार असून त्यांच्या डाव्या पायाचा गुडगाही बदलायचा आहे. एल्गार परिषदेशीही शोमा सेन यांचा संबंध नसल्याने त्यांना जामीन देण्यात यावा अशी मागणी ऍड. देशमुख यांनी केली. दरम्यान सोमवारी नजरकैदेत असलेले मानवाधिकार कार्यकर्ते ऍड. अरुण फरेरा आणि वरनॉन गोन्सालवींस यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. तर मंगळवारी सुधा भारद्वाज यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होण्याची शक्‍यता आहे.

 

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)