“त्या’ तीन प्रकल्पांची अखेर वर्कऑर्डर

पंतप्रधान आवास योजना ः अनेक दिवसांपासून रखडले होते काम

पिंपरी – वेगवेगळ्या कारणांमुळे गेल्या दिड वर्षांपासून रखडलेल्या पंतप्रधान आवास योजना प्रकल्पांचे अखेर कार्यादेश काढण्यात आले आहेत. काही विवादांमध्ये अडकलेले हे प्रकल्प अखेर मार्गी लागले आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांनी शहरातील पंतप्रधान आवास योजना प्रकल्पाची आढावा बैठक घेतली. भूमी अधिग्रहण विविध परवानग्यामुळे हा प्रकल्प गेल्या दिड वर्षांपासून रखडला आहे. पिंपरी, बोऱ्हाडेवाडी व चऱ्होली या तीन प्रकल्पांच्या कामाचे आदेश आयुक्‍तांनी नुकतेच काढले आहेत. नियमानुसार कामाचे आदेश निघाल्यानंतर अडीच वर्षात प्रकल्प पूर्ण होणे अपेक्षित आहे.

केंद्र सरकारमार्फत सर्वांसाठी घरे- 2022 या संकल्पनेवर पिंपरी-चिंचवड पालिकेने सामील होण्याबाबत राज्य सरकारने डिसेंबर 2015 मध्ये पालिकेला कळविले. शहरातही नऊ ठिकाणी हा प्रकल्प राबवला जाणार आहे. त्यामध्ये पिंपरी, आकुर्डी, बोऱ्हाडेवारी, चऱ्होली, डुडुळगाव, वडमुखवाडी, चिखली व दिघी या नऊ ठिकाणांचा समावेश आहे. प्रत्येकाला घर या योजनेअंतर्गत 30 चौरस मीटर चटई क्षेत्रांची घरे दिली जाणार आहेत. यांची किंमत आठ ते नऊ लाख रुपयांपर्यंत असून यातील पाच लाख रुपये लाभार्थ्यांना भरावे लागणार आहेत.

या बैठकीमध्ये संपूर्ण प्रकल्पाचा आढावा घेण्यात आला. त्यामध्ये आकुर्डी, रावेत, चऱ्होली, बोऱ्हाडेवाडी, पिंपरी या पाच प्रकल्पाचे प्रकल्प आराखडा तयार आहे. त्यानुसार चऱ्होली येथे 122.32 कोटी रुपयांचा प्रकल्प असून यामध्ये 1 हजार 442 घरे बांधली जाणार आहेत, रावेत येथे 79.46 कोटी खर्च असून 934 घरे बांधली जाणार आहेत, बोऱ्हाडेवाडी येथे 109.88 कोटी रुपयांचा खर्च असून 1 हजार 288 घरे बांधली जाणार आहेत, आकुर्डी येथे 52.76 कोटी रुपयांचा खर्च येणार असून 568 घरे बांधली जाणार आहेत. पिंपरी येथे 33.64 कोटी रुपयांचा खर्च असून 370 घरे अशी एकूण 4 हजार 602 घरे बांधली जाणार आहेत. दिघीतील 840 व चिखलीतील 1400 व डुडुळगाव व वडमुखवाडी या प्रकल्पांच्या घरांसाठी आरक्षित भूखंड पालिकेच्या ताब्यात नाहीत.दोन्ही सरकारी गायरान जमिनी असून त्या जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पालिकेच्या ताब्यात मिळणे गरजेचे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)