‘हे’ दाम्पत्य ठरले यंदाच्या पुजेचे मानकरी

पंढरपूर : आषाढी एकादशीच्या पहाटे विठ्ठलाची पूजा करण्याचा मान यंदा लातूरच्या वारकरी दाम्पत्याला मिळाला आहे. विठ्ठल मारुती चव्हाण आणि त्यांची पत्नी प्रयागाबाई चव्हाण हे मानाचे यंदा वारकरी ठरले. विठ्ठल चव्हाण हे सांगवीच्या सुनेगाव तांडा इथले रहिवासी आहेत.

1980 सालापासून ते पंढरीची वारी न चुकता करतात. मुख्यमंत्र्यांसोबत पांडुरंगाची पूजा करण्याचा मान मिळाल्यामुळे आनंद झाल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. तसेच महाराष्ट्रावरचं दुष्काळाचे संकट दूर व्हावं आणि बळीराजा सुखी व्हावा यासाठी विठुरायाला त्यांनी साकडे घातले. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या वारकरी दाम्पत्याचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांना 15 हजाराचा धनादेश तसेच 1 वर्षाचा मोफत बस प्रवासाचा पास मुख्यमंत्र्यांच्या हस्ते देण्यात आला.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here