कोल्हापूर – यंदाचा कृषी महोत्सव डिसेंबरमध्ये आयोजित करण्याचा निर्णय कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेच्या नियामक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन (आत्मा) यंत्रणेच्या नियामक मंडळाची बैठक आज संपन्न झाली. यावेळी हा निर्णय घेण्यात आला.
बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, उपजिल्हाधिकारी अमित माळी, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे, कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. जी. जे. खोत, आत्माचे प्रकल्प संचालक अशोक पाटील यांच्यासह सदस्य आणि अधिकारी उपस्थित होते.
कृषी महोत्सवाच्या माध्यमातून शेतीचे प्रगत तंत्रज्ञान, आधुनिक साहित्य, औजारे यांची माहिती तसेच सेंद्रीय शेतीचा प्रचार आणि प्रसार यावरही भर देण्याची सूचना जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी केली. यंदाचा कृषी महोत्सव नेटका आणि नियोजनबध्द व्हावा यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याची सूचनाही त्यांनी केली. या महोत्सवाचा अधिकाधिक शेतकऱ्यांना लाभ व्हावा, यादृष्टिनेही नियोजनावर भर देण्याची सूचना त्यांनी केली.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा