यंदा ऑस्करच्या “ड्रेस कोड’मध्ये झाला बदल

ऑस्कर पुरस्कार सोहळ्यावेळी पारंपारिक “ड्रेसकोड’मध्ये बदल झाल्याचे चित्र बघायला मिळाले. दरवर्षीच्या काळ्या रंगांच्या टायला थोडेसे दूर लोटत यंदाच्या “ड्रेस कोड’मध्ये पांढऱ्या रंगाला थोडे जास्त महत्व दिले गेले. ज्यात महिलांसाठी ग्लिटरी गाऊन आणि पुरुषांसाठी टेलकोट, विंगटीप कॉलर आणि व्हाईट टाय असा एकंदर ड्रेसकोड ठेवण्यात आला होता.
ऑस्करच्या समारंभामधील सेलिब्रिटीजच्या पेहरावाकडे सिनेरसिकांच्या नजरा लागलेल्या असतात.

प्रत्येक सेलिब्रिटीच्याच स्टाईल स्टेटमेंटकडेही ऑस्करचा थाट पाहण्यासाठी येणाऱ्यांच्या नजरा लागलेल्या असतात. या समारंभासाठीच्या “ड्रेसकोड’विषयी प्रायोजकांचे विशेष लक्ष असते. ज्यात फॅशन, ड्रेसकोड आणि त्यातही आपले वेगळेपण या निकषांच्या आधारे सेलिब्रिटी मंडळी ऑस्करसाठीच्या पेहरावाची निवड करतात.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)