यंदा कार्तिकी एकादशीच्या दिवशी मद्य आणि मांस विक्रीस परवानगी

पंढरपूर – कार्तिकी एकादशी म्हटले की, डोळ्यांसमोर पहिली येते ती पंढरपूर आणि भक्तीचा उत्सव, भक्त आणि ईश्‍वर यांचा अनोखा मेळा म्हणजे पंढरपूरची एकादशी यात्रा. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्त्वाचा मानण्यात येतो. लाखो भाविक विठ्ठलनामाचा गजर करीत पंढरपुरास पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करून विठ्ठलाचे दर्शन घेतात. यावेळी पंढरपूरमध्ये मद्य आणि मांस विक्रिवर बंदी घातली जाते मात्र यंदा कार्तिकी एकादशीच्या दिवशी पंढरपूरमध्ये मद्य आणि मांस विक्रीस परवानगी देण्यात आली आहे.

दरम्यान, पंढरपूरमध्ये कार्तिकी एकादशीच्या दिवमध्ये सलग तीन दिवस मद्य व मांस विक्रिवर बंदी घातली जाते. मात्र या वर्षी जिल्हा प्रशासनाने 18 नोव्हेंबर रोजी  केवळ एक दिवस मद्य व मांस विक्रिवर बंदी घातली आहे. त्यामुळे या निर्णयामुळे खळबळ उडाली आहे.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)