‘अश्या’प्रकारे विराटने साजरा केला शतकाचा आनंद!!!

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पहिला कसोटी सामना अनेक कारणांसाठी प्रकाशझोतात राहणार हे अगोदरच निश्चित होते. या सामन्याच्या अगोदर अशी अटकळ होती की हा दौरा विराट कोहलीची ‘कसोटी’ पाहणारा दौरा ठरेल. परंतु विराटने पहिल्याच कसोटीमध्ये शानदार शतक ठोकून हा सामना गाजवला.

भारताचे मातब्बर फलंदाज एकापाठोपाठ बाद होत असताना विराटने एक बाजू धरून ठेवली आणि शतक साजरे केले. या शतकाचे कौतुक तर होतेच पण त्यानंतर त्याने असे काही केले की ज्यामुळे हे शतक आणखीनच चकाकून गेले.
बेन स्टोक्सच्या गोलंदाजीवर चौकार खेचत त्याने शतक साकारले. त्यानंतर त्याने आपली बॅट जमिनीवर ठेवली आणि ड्रेसिंगरूमकडे पाहत आपल्या गळ्यातील ‘वेडिंग रिंग’ काढून पत्नी अनुष्का शर्माला दाखवत त्याला किस केले. त्याने आपले शतक अनुष्का शर्माला समर्पित केले.
सध्या क्रिकेटमध्ये शतकानंतर आपल्या पत्नीला समर्पित करण्याचे एक नवीन सत्र सुरु आहे. रोहित शर्माने देखील द्विशतक केल्यानंतर त्याची पत्नी प्रियांका शर्मा हिला आपले द्विशतक समर्पित केले होते.

 

-Ads-


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)