देशात यंदाही आबादानी!

पुढील दोन महिन्यांत 95% पाऊस होणार
हवामान विभागाचा दुसऱ्या टप्प्यातील अंदाज

पुणे -पावसाने सध्या घेतलेल्या विश्रांतीनंतर पुढील काही दिवसांत दमदार पावसाची आशा आहे. भारतीय हवामान शास्त्र विभागाने मान्सूनचा दुसऱ्या टप्प्यातील अंदाज नुकताच जाहीर केला. यानुसार आगामी दोन महिन्यांत देशात 95 टक्के पाऊस बरसणार आहे. त्याचा कृषी क्षेत्राला मोठा फायदा होणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरवर्षी हवामान खात्याच्यावतीने मान्सूनचा अंदाज वर्तविण्यात येतो. पहिल्या टप्यातील अंदाज हा एप्रिलमध्ये जाहीर करण्यात येतो, तर दुसऱ्या टप्यातील अंदाज हा जुलैमध्ये जाहीर करण्यात येतो.
पहिल्या टप्यातील अंदाज ऑगस्टमध्ये सरासरीपेक्षा कमी म्हणजेच 94 टक्के पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविण्यात आला होता. मात्र दुसऱ्या टप्यातील अंदाजात 96 टक्के पाऊस पडण्याची शक्‍यता आहे.

महाराष्ट्राला जुलैने तारले
महाराष्ट्रात जुलै अखेरपर्यंतची सरासरी 543.8 आहे. त्या तुलनेत 613.8 मिलिमीटर म्हणजेच सरासरीपेक्षा 13 टक्के अधिक पाऊस पडला आहे. सरासरीच्या उणे किंवा अधिक 10 टक्के पाऊस सर्वसाधारण मानला जातो. विभागनिहाय पावसाचा विचार करता सर्वच विभागांत सर्वसाधारण पाऊस झाला आहे. यात मराठवाडा मात्र पिछाडीवर आहे.

विभागनिहाय पाऊस (टक्‍क्‍यांत)
मराठवाडा- 91
विदर्भ – 111
मध्य महाराष्ट्र – 111
कोकण – 123

सरासरीचा अंदाज (टक्‍क्‍यांत)

94 टक्‍क्‍यांपेक्षा कमी – 47
94 ते 106 टक्के- 41
100 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक- 12
(ऑगस्ट-सप्टेंबरसाठी)

नवीन अंदाजातील ठळक मुद्दे
जुलैमध्ये बिहार, झारखंड आणि ईशान्य भारतात पावसाची तूट.
उर्वरित दोन महिन्यांतही पावसाच्या वितरणाची हिच स्थिती कायम राहणार.
यंदाचा मान्सून कृषी क्षेत्राला लाभदायक ठरण्याची चिन्हे.
पहिल्या टप्प्यात बिहार, झारखंड आणि ईशान्य भारतातील राज्यांची निराशा


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)