‘हा’ मोठा फुटबॉलपटू करतो विराटला फॅलो !

इंडियन सुपर लीग (आईएसएल)च्या नाविन मोसमाची सुरुवात २७ सप्टेंबर पासून होत आहे. या नाविन मोसमासाठी अनेक विदेशी खेळाडूंना करारबद्ध केले आहे. त्यात ऑस्ट्रेलियाचाआणि इंग्लिश प्रीमियर लीगमधील एवरटन एफसीसाठी यशस्वी खेळाडू ठरलेला टिम काहिलचा देखील समावेश आहे.

टिम काहिल याला जमशेदपूर एफसीने करारबद्ध केले आहे. या खेळाडूचे मोठ्या जल्लोषात जमशेदपूर एफसीच्या प्रशंसकांनी स्वागत केला. टिम काहिल हा भारतीय राष्ट्रे क्रिकेट संघाचा नियमित कर्णधार विराटचा मोठा चाहता आहे. विराट कोहली साठी त्याच्या मानत खूप आदर आहे.

टिम काहिलने ‘मीडिया डे’ साठी आल्यानंतर सांगितले की, ऑस्ट्रेलियामध्ये ज्या काही महान भारतीय खेळाडूंची चर्चा होते. त्यामध्ये सचिन तेंडुलकर याचे नाव सर्वप्रथम घेतले जाते. परंतु, मला विराट देखील खूप आवडतो. कराण तो या यादीत जाण्यास इच्छुक दिसतो. त्याने आपली कारकिर्द ज्याप्रमाणे घडवली ते कौतुकास्पद आहे. मी त्याला सोशल मीडियावर देखील फॉलो करतो.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)