‘या’ कारणासाठी धोनीने घेतला होता चेंडू

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील मालिका खूप रोमांचकारी होत आहे. ट्वेण्टी-२० सामन्याची मालिका भारतीय संघाने जिंकली तर एकदिवसीय मालिकेत बाजी यजमान देशाने मारली. पहिल्या अटातटीच्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला थोडक्यात पराभव स्वीकारावा लागला आहे.

एकदिवसीय मालिकेत अनेक नाट्यमयी घटना घडल्या परंतु सर्वात चर्चेत राहिली ती महेंद्रसिंग धोनी बाबतची घटना. एकदिवसीय मालिकेच्या तिसर्या आणि अंतिम सामन्यात भारतीय संघाला पराभव स्वीकारावा लागला होता. या सामन्यानंतर भारतीय विकेट कीपर महेंद्रसिंग धोनीने अम्पायरकडून बॉल घेतला. सामना जिंकल्यानंतर अनेकदा आपल्यासोबत स्टम्प्स घेणारा धोनी सामना हरल्यानंतर देखील बॉल का घेतो आहे यामुळे अनेक चर्चांना उधाण आले. त्यातील एक म्हणजे, धोनी निवृत्ती घेत आहे त्यामुळे त्याने बॉल घेतला.

अनेक चर्चांना उधाण येत आहे हे पाहून भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्री यांनी या चर्चांना पूर्णविराम देत त्या घटनेमागील खरे कारण सांगितले होते की, भारतीय गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण यांना बॉल दाखवण्यासाठी धोनीने बॉल घेतला. ४० ओव्हरनंतर बॉलची काय स्थिती असते हे त्यांना दाखवायचे होते.
महेंद्रसिंग धोनीने देखील एका व्हिडिओद्वारे त्याने बॉल घेण्यामागचे कारण स्पष्ट केले. त्याने बॉल भारतीय गोलंदाजी प्रशिक्षक यांना दाखवण्यासाठीच घेतला होता.

-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)