हा मोदी शब्दाला जागणारा ; सगळ्यांचा योग्यवेळी हिशेब मांडला जाईल- पंतप्रधान

रुद्रपुर (उत्तराखंड)  : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात उडी घेतली असून आज त्यांनी धडाकेबाज दोन सभा पार पाडल्या. दरम्यान, मोदींनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. ७० वर्ष काँग्रेसने गरिबांना धोका दिला आहे. त्यांनी गरिबांचा विचार कधीच केला नाही. त्यामुळे देशातील गरिबी हटविण्यासाठी काँग्रेसला हटविणे गरजेचे आहे. त्यांनी आज मेरठमधून प्रचाराला सुरवात केली. त्यानंतर त्यांनी उत्तराखंड रुद्रपूर येथे सभा घेतली.

अंतराळात सर्जिकल स्ट्राईक करण्याचं धाडस या सरकारमध्ये, हे सरकार संकल्पांना सिद्धीस नेणारे आहे. गेल्या सरकारच्या अपयशाचा जाब विचारणार. महाबनावट सरकारच्या काळात बदमाश लोक होते. मी चौकीदार आहे. सगळ्याचा हिशोब योग्यवेळी मांडणार आहे, असे मोदी म्हणाले. काँग्रेसने माजी सैनिकांना धोक्यात ठेवले. वन रैंक वन पेन्शन योजना अटकून ठेवली होती. त्यासाठी फक्त ५०० करोडचा बजेट होता. आणि आमच्या सरकारने  वन रैंक वन पेन्शन योजनेला मंजुरी दिली आणि ३५००० करोड रुपये सैनिकांना दिले असल्याचे मोदी म्हणाले.

राहुल गांधी यांनी निवडणूक प्रचार सभांमध्ये कॉंग्रेस देशात किमान वेतन हमी योजना लागू करेल अशी घोषणा केली होती. किमान उत्पन्नासंदर्भात काँग्रेसच्या घोषणेवर मेरठ येथील जनसभेत मोदी यांनी प्रश्न उपस्थित करून काँग्रेस पक्षावर हल्लाबोल केला आहे.

राहुल गांधी यांनी घोषित केलेल्या किमान उत्पन्न हमी योजना जाहीर केली होती या संदर्भात मेरठ येथील जनसभेत मोदी यांनी म्हटले, ‘जेव्हा मी बँक खाते उघडण्यास सांगत होतो तेव्हा काही बुद्धिमान लोकांनी म्हटले होते देशांतर्गत बँक नाही, खाते कसे उघडणार? जे 70 वर्षांत गरीबांचे बँकेत खाते उघडू शकले नाही, ते गरिबांच्या खात्यात पैसे देणार.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)