हा तर “पायलट’ प्रोजेक्‍ट : पंतप्रधान मोदींचे सुचक विधान

खरं काम तर नंतर करु

नवी दिल्ली – पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारतीय हवाई दलाचे पायलट विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांची उद्या सुटका होणार असल्याचे वृत्त येताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणाची सुरुवात रंजक पद्धतीने केली. आपण कायमच प्रयोगशाळेत जीवन व्यतीत करणारे लोक आहात. एखादे संशोधन करताना सुरुवातीला तुम्हाला एखाद्या पायलट प्रोजेक्‍टवर काम करण्याची सवय असते. असाच एक “पायलट’ प्रोजेक्‍ट आम्हीही यशस्वी केला आहे, असे सूचक विधान करत त्यांनी पाकिस्तानला अप्रत्यक्ष इशारा दिला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

नवी दिल्लीतील विज्ञान भवनात सुरु असलेल्या शांतीस्वरुप भटनागर पुरस्काराच्या कार्यक्रमात मोदी बोलत होते. यावेळी त्यांनी सुरुवातीला उपस्थितांना विज्ञान दिनाच्या दिल्या शुभेच्छा दिल्या. यावेळी सर्व पुरस्कार विजेत्या संशोधकांचे उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट अभिनंदन केले.

हवाई दलाचे पायलट विंग कमांडर अभिनंदन यांच्या सुटकेबाबत भाष्य करताना मोदी म्हणाले, आता केवळ प्रॅक्‍टिस होती खरं काम तर नंतर करु. या विधानाद्वारे मोदींनी भारत आता पाकिस्तानच्या कुरापतींना बिल्कूल थारा देणार नसल्याचे सुतोवाच केले.

मोदी म्हणाले, “जय जवान, जय किसान आणि जय विज्ञान’ ही घोषणा नव्या भारताचा मार्ग व्हावी त्यासाठी अशा पुरस्कारांची गरज आहे. मी स्वतः विज्ञानाला लोकांच्या गरजांशी जोडण्याला आग्रही असतो. आमचे सरकार त्या दृष्टीने कायम प्रयत्नशील आहे. विज्ञान-तंत्रज्ञानाला लोकांच्या गरजांशी जोडायला हवे. त्यामुळे तरुणांना संशोधनासाठी प्रेरणा मिळेल, असे त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)