नरेंद्र मोदी सरकारचा ‘हा’ पहिलाचं मोठा निर्णय

नवी दिल्ली: प्रधानमंत्री स्कॉलरशिप स्कीम’च्या निधीत वाढ करण्याची मंजूरी देण्यात आली आहे. नवीन मंत्र्यांससमवेत आज पहिली कॅबिनेट मिटींग झाली. यामध्ये राष्ट्रीय संरक्षण निधीच्या अंतर्गत ‘पंतप्रधानांच्या शिष्यवृत्ती योजनेत’ मोठा बदल करण्यात आला आहे.

शिष्यवृत्तीची दर रु. २००० दरमहा वाढणव्यात आला असून यामध्ये मुलांसाठी शिष्यवृत्ती २२५० वरून २५०० करण्यात आली आहे. आणि मुलींना ३००० प्रतिमहिना देण्यात शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. तसेच शहीद पोलिसांच्या मुलांच्या शिष्यवृत्तीत ५०० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. राष्ट्रीय संरक्षण निधीअंतर्गत ही स्कॉलरशिप शहीद जवान आणि अधिकाऱ्यांच्या मुलांना दिली जाते. याला पंतप्रधान शिष्यवृत्ती योजना असे म्हणतात.

https://twitter.com/ANI/status/1134432485847261186

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)