‘हा’ काही फार मोठा विषय नाही : कुमारस्वामी

बंगळुरू: ‘मारेकऱ्यांना दयामाया न दाखवता गोळ्या घालून ठार मारा’ असे वादग्रस्त विधान केल्याने कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी यांच्यावर चोहीबाजूने टीका होऊ लागली आहे. असे असताना देखील ‘आपण त्या वक्तव्याबाबत माफी मागणार नाही.’ अशी भूमिका कुमारस्वामी यांनी घेतल्याने हे प्रकरण आणखीन चिघळण्याची चिन्हे आहेत.

दरम्यान आपल्या वक्तव्याबाबत आपली भूमिका स्पष्ट करताना कुमारस्वामी यांनी, “आपण अत्यंत भावनिक गृहस्थ आहोत त्यामुळे भावनेच्या भरात आपल्या तोंडून हे विधान बाहेर पडले आहे त्या मागची भावना महत्वाची आहे. या विषयी मी माफी मागण्याची काही एक गरज नाही.” असे सांगितले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मंड्या जिल्ह्यातील जेडीएस पक्ष कार्यकर्त्याची सोमवारी हत्या झाली या घटनेचे वृत्त ऐकल्यानंतर त्यांनी फोन वरून अधिकाऱ्यांना मारेकऱ्यांना गोळ्या घालून ठार मारा अशी सुचना केल्याचे संभाषण व्हायरल झाल्यानंतर विरोधी पक्षांनी त्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी अशी मागणी केली होती.

ते म्हणाले की हा काही फार मोठा विषय नाही. ही सहज मानवीप्रवृत्ती आहे. विपरीत परिस्थितीत पोटतिडकीने एखादी व्यक्ती जशी रिऍक्‍ट होते तशी ती प्रतिक्रीया माझ्या तोंडून बाहेर पडली. त्याचा मी या आधीच खुलासा केला आहे आणि मी त्या प्रतिक्रीयेतील काही शब्दही बदलले आहेत त्यामुळे आता पुन्हा त्यावरून माफी मागावी असे मला वाटत नाही. दरम्यान हा विषय आता मानवाधिकार आयोगाकडे गेला आहे. मुख्यमंत्र्यांचे हे विधान म्हणजे मानवाधिकाराची पायमल्ली असून त्यानुसार त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी करणारी याचिका राज्य मानवाधिकार आयोगाकडे करण्यात आली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)