‘ये मोदी का हिंदुस्तान है, घर में घुसेगा भी और मारेगा भी’ – केंद्रीय मंत्री

नवी दिल्ली – भारताने वायूसेनेच्या १२ मिराज २००० लढाऊ विमानांनी पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवादी तळांवर हल्ला केला. या हल्ल्यात जवळपास २००-३०० दहशतवादीही ठार झाल्याचे सांगण्यात आले आहे. या कारवाईनंतर अनेक राजकीय नेत्यांनी वायुसेनेचे कौतुक केले आहे. नरेंद्र मोदी सरकारमधील केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी ‘ये मोदी का हिंदुस्तान है, घर में घुसेगा भी और मारेगा भी’ असे म्हंटले आहे.

गजेंद्र सिंह शेखावत यांनी म्हंटले कि, रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा हिशेब घेतला जाईल. भारतीय हवाई दलाने केलेली कारवाई ही फक्त सुरुवात असून ये मोदी का हिंदुस्तान है, घर में घुसेगा भी और मारेगा भी, असे ट्विट त्यांनी केले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

https://twitter.com/gssjodhpur/status/1100244765529001984

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)