हे सरकार केवळ जाहिरातींचे सरकार : शशी थरूर

File photo

जयपूर साहित्य संमेलनात शशी थरूर यांचे प्रतिपादन

जयपूर: सध्याचे केंद्र मधले सरकार हे केवळ जाहिरातींचे सरकार असून कसलेही काम सरकारने जाहीर केलेली नाही. कसलीही योजना यशस्वी नसताना हे सरकार पाच हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम केवळ जाहिरातींवर खर्च करत आहे. या सरकारच्या संयुक्त पुरोगामी आघाडीच्या सरकारने जास्त चांगली आणि मोठी कामे केली होती मात्र त्याची इतकी मोठी जाहिरात आम्ही कधीच केली नव्हती, असे थरूर म्हणाले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शेतकरी आत्महत्या आणि कर्जमाफी याविषयी बोलताना शशी थरूर म्हणाले की शेतकरी कर्जमाफी हा तात्पुरता उपाय आहे हे मान्य केले तरीही शेतकरी आत्महत्या वाढत असतील तर त्याला काही उपाय करणे गरजेचे असते, त्यामुळे कर्जमाफी दिली जाते. मात्र शेतकऱ्यांना दिलेली कर्जमाफी म्हणजे करदात्यांच्या पैशांचा अपव्यय नाही. जाहिरातींवर पैसा खर्च करणे. हा करदात्यांच्या पैशांचा अपव्यय आहे.

ऍक्‍सिडेंटल प्राईम मिनिस्टर वास्तवापासून दूर
ऍक्‍सिडेंटल प्राईम मिनिस्टर हा सिनेमा म्हणजे वास्तव कादंबरी पासून दूर जाणारा सिनेमा असून हे काल्पनिक कथानक आहे. लोक सिनेमा मनोरंजनासाठी पाहायला जातात मात्र वादग्रस्त गोष्टी सिनेमांमध्ये दाखवून काय साध्य करायचे ते समजत नाही. एका सिनेमामुळे एका पंतप्रधानाची बदनामी होईल असे काहीही घडत नसते. मतदार हा हुशार असतो आणि त्यांना कोणत्या सिनेमाचा हेतू काय आहे हे बरोबर समजते त्यामुळे या सिनेमाने कॉंग्रेस मनमोहन सिंग यांना कोणताही नुकसान झालेले नाही. “एक था टायगर’ सारख्या सिनेमामध्ये सलमान खान बरोबर एका मंत्र्याची भूमिका करण्याबाबत मला विचारण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात मंत्रिपदाचा अनुभव आहे त्यांनी खोटा खोटा मंत्री बनवण्याचे कारणच काय असे सांगत मी तो सिनेमा नाकारला होता असे थरूर म्हणाले.

कॉंग्रेस पक्षाकडून क्षमतेचा पुरेसा वापर करून घेतला जात नाही, याविषयी विचारले असता थरूर म्हणाले की मी माझा मतदारसंघ माझे राज्य आणि पक्ष देईल ती जबाबदारी चोखपणे पार पाडत आहे. निवडणुका जिंकण्यासाठी एका वेगळ्या धोरणाची आवश्‍यकता असते त्या अंतर्गत पक्षाने प्रियंका गांधी यांना सरचिटणीस पद देऊन पक्षाची भूमिका अधिक स्पष्ट केली आहे. त्यामुळे त्याशिवाय पक्षाने वेगवेगळ्या विषयातील पाचशे व्यावसायिकांना नेमले असून कॉंग्रेसची मध्यवर्ती कार्यकारणी आणि हे व्यावसायिक मिळून निवडणूक जिंकण्याचे धोरण ठरवत आहेत.

प्रियंका गांधी यांना सरचिटणीस देण्याबाबत थरूर म्हणाले की ही घराणेशाही अजिबात नसून जी लोकप्रियता जी मान्यता देशभर गांधी परिवारातील सदस्यांना असते, त्याचा लाभ कॉंग्रेसला व्हावा.मात्र आगामी निवडणुकांमध्ये प्रियंका गांधी या फक्त उत्तर प्रदेशावर लक्ष केंद्रित करतील. असेही ते म्हणाले.

सीबीआय आणि रिझर्व बॅंक ऑफ इंडिया मीडिया या सर्वांविषयी बोलताना म्हणाले की मोदी सरकारने सीबीआयचा पोलिटिकल फुटबॉल केला आहे. तसेच सीबीआय ही स्वायत्त संस्था करणे अत्यंत गरजेचे असून सरकारच्या अशा संस्थांमधील हस्तक्षेप थांबवणे ही सर्वात मोठी गरज निर्माण झाली आहे. त्याचबरोबर सरकार राज्य सरकार आणि सामान्य नागरिक यांच्या एकत्रित समन्वयातून विकासाच्या योजना राबवणे आवश्‍यक आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)