पंतप्रधानांच्या या घोषणामुळे होणार उद्योजकांना नफा

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगां(एमएसएमई)साठी व्याजावरच्या अनुदानासहीत इतर मोठ्या घोषणा करण्याची शक्यता आहे.या घोषणेनंतर एमएसएमई क्षेत्राला गती मिळेल आणि रोजगार वाढण्यासाठीही मदत होणार आहे.

दरम्यान, लघु उद्योग भारती संघटनाचे विभागीय अध्यक्ष महेश गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज दुपारच्या सुमारास सीए भवन येथे सर्व उद्योजकांची बैठक आयोजित केली आहे. तसेच या बैठकी दरम्यान सर्व उद्योजक कार्यक्रम ऐकणार आहे आणि आपल्या सूचना लिखित स्वरूपात संघटनेस देणार आहे. या सूचना पंतप्रधानांपर्यंत पोहचविण्यात येणार आहे. तसेच केंद्रीय अर्थ मंत्रालय या प्रस्तावावर काम करत आहे.

सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योजकांना नफा

– जास्त व्याजावर अनुदान मिळाल्यास कर्जे स्वस्त होतील आणि एमएसएमई क्षेत्रात कर्ज घेण्याचं प्रमाण  वाढेल.

-एमएसएमई सेक्टरमध्ये 6.3 कोटींहून अधिक युनिट्स आहेत आणि 11.1 कोटी लोकांना या युनिट्समधून  रोजगार मिळतो.

-जीडीपीतही या क्षेत्राचं 30 टक्के योगदान आहे. उत्पादनातही या क्षेत्राची 45 टक्के भागीदारी आहे.

-देशातील एकूण निर्यात होणाऱ्या वस्तूंमध्ये या क्षेत्राचं 40 टक्के योगदान आहे.

-एमएसएमई युनिट्स समोर कर्जाची सर्वात मोठी समस्या आहे. त्यामुळे उद्योगाला उपयुक्त कर्ज अनुदानाच्या  माध्यमातून मिळाल्यास या क्षेत्राला त्याचा मोठा फायदा होऊ शकतो.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)