तेरा हॉटेल्सचे परवाने निलंबित

सातारा अन्न व औषध प्रशासनाची कारवाई

सातारा – सातारा जिल्ह्यातील तेरा हॉटेल्सचे परवाने निलंबीत केल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त शिवकुमार कोडगिरे यांनी दिली.कोटगिरे यांनी पदभार स्विकारल्यानंतर जिल्ह्यामध्ये विविध हॉटेल्सची तपासणी मोहीम धडाक्‍यात सुरू केली आहे. अन्न औषध प्रशासनाच्या वतीने विविध हॉटेल्सची नित्य तपासणी केली जात असते. जिल्ह्यातील हॉटेल्समध्ये नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अन्न सुरक्षा व मानकांचा अवमान केल्याच्या बाबी निदर्शनास आल्यामुळेच आपण परवाने निलंबनाची कारवाई केल्याचे कोडगिरे यांनी सांगितले.

कारवाई केलेल्या हॉटेल्समध्ये कामगाराना सऍप्रन व हॅन्डग्लोज नाही, हॉटेलच्या किचनमध्ये स्वच्छता नाही,खाद्यपदार्थ उघड्यावर ठेवले आहेत, पेस्ट कंट्रोल रेकॉर्ड राखले नाही, हॉटेलच्या कामगारांची वैद्यकीय तपासणी केली नाही. तसेच हॉटेलच्या खिडक्‍यांना बारीक जाळया बसविल्या नाहित, छताला जाळे जळमटे आढळल्याचे तपासणीत निदर्शनास आले. त्यामुळे शिवराज ढाबा, मु.पो. गोटे ता.कराड, आराध्या डाईन इन (नैवेद्य),ता.कराड, हॉटेल राजयोग (विठ्ठल कामत) मु.पो.पेरले,ता.कराड, हॉटेल मानसी रॉयल मु.पो.खेड सातारा, हॉटेल गुलबहार रविवार पेठ पोवई नाका सातारा, हॉटेल मानसी प्राईड यशोदानगर गोडोली सातारा, श्री हरी ओम फरसाण मु.पो कारवे ता.कराड, हॉटेल अमराई मु.पो.खंडाळा जुन्या टोलनाक्‍याजवळ ता. खंडाळा, जोशी वडेवाले खंबाटकी घाट मु.पो. खंडाळा, मे हरी ओम फरसाण शनिवार पेठ लक्ष्मी नारायण चौक ता.कराड, मे. राजपुरोहित स्वीटस बुधवार पेठ, प्रभात टॉकीज जवळ ता. कराड, मे सिट्रस चेबर्स महाबळेश्‍वर प्रा.लि.एलसी डिसोजा रोड ता. महाबळेश्‍वर, मे. लेक व्हयू हॉटेल मखारीया गार्डन समोर ता. महाबळेश्‍वर जि सातारा अशी कारवाई केलेल्या 13 हॉटेल्सची नावे आहेत. या हॉटेल्सचा परवाना दोन ते चार दिवस कालावधीकरीता निलंबित केला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

निलंबित कालावधीमध्ये अन्न पदार्थाचे उत्पादन, साठा व विक्री केल्याचे आढळल्यास या हॉटेल्सवर पुन्हा मानके कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल. या कारवाईमध्ये अन्न सुरक्षा आधिकारी रोहन शहा, श्रीमती रूपाली खापणे, अनिल पवार, राहुल खंडागळे, यांनी सुरेश देशुमुख, सह आयुक्त अन्ना औषध पुणे विभाग व शिवकुमार कोडगिरे, सहाय्यक आयुक्त अन्न औषध प्रशासन सातारा यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली आहे. जिल्ह्यातील हॉटेल व्यवसायिकांनी अन्न सुरक्षा मानकाचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन देखील यावेळी कोडगिरे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)