पुणे – तिसऱ्या फेरीत 5 हजार 801 विद्यार्थ्यांकडून प्रवेश

पुणे – अकरावीच्या तिसऱ्या फेरीत 5 हजार 801 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. तिसऱ्या यादीत प्रवेश मिळूनही 11 हजार 351 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला नाही. त्यांना चौथी फेरीची प्रतीक्षा करावी लागेल. चौथी प्रवेश फेरी दि.7 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता जाहीर होणार आहे, अशी माहिती शिक्षण उपसंचालक मिनाक्षी राऊत यांनी दिली.

अकरावीच्या तिसऱ्या फेरीत 17 हजार 152 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला होता. या विद्यार्थ्यांना प्रवेश कन्फर्म करण्याचा गुरुवारी शेवटचा दिवस होता. अखेरच्या दिवशी 5 हजार 801 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. तर, 340 विद्यार्थ्यांनी प्रवेश रद्द केला आहे. तिसऱ्या फेरीत प्रवेश न घेतलेल्या विद्यार्थ्यांनी आवश्‍यकता वाटेल तर पसंतीक्रम बदलावेत. अन्यथा कोणतीच कार्यवाही न करता चौथी यादीची प्रतीक्षा करावे लागेल.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अकरावीची चौथी यादी येत्या मंगळवारी जाहीर होणार आहे. या यादीनुसार प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना दि. 7 ते 9 ऑगस्ट या कालावधीत प्रवेश घेणे आवश्‍यक आहे. तसेच, चौथ्या यादीसाठी दि. 3 व 4 ऑगस्टपर्यंत अर्ज न केलेल्या विद्यार्थ्यांना अर्ज भरता येतील. पसंतीक्रमही बदलता येतील, असेही अकरावी प्रवेश समितीकडून सांगण्यात आले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)