तृतीयपंथी कार्यकर्त्या गौरी सावंत निवडणुकीच्या सदिच्छा दूत

मुंबई – लोकसभा निवडणुकीत मतदारांनी अधिकाधिक मतदान करावे यासाठी भारत निवडणूक आयोग वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांची मदत घेत असते. यंदा पहिल्यांदाच तृतीयपंथी कार्यकर्त्या गौरी सावंत यांचीसुद्धा निवडणून सदिच्छा दूत म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

वर्ष २०१४च्या सार्वत्रिक निवडणुकीवेळी २३,१०९ मतदारांनी मतदारयादीत आपले लिंग ‘अन्य’ असे नोंदले होते. अशा प्रकारे स्त्री/पुरुष/अन्य असे लिंग नोंदवण्यास वर्ष २०१२ मध्ये निवडणूक आयोगाने मान्यता दिली होती. याचा अर्थ मागील पाच वर्षात फक्त १५,३०६ नव्या ‘अन्य’ (म्हणजेच तृतीयपंथी) मतदारांची नोंद झाल्याचे दिसून येत आहे. ही वाढ आणि एकूण मतदारनोंदणी कमालीची कमी असल्याचे मत या क्षेत्रात कार्य करत असलेल्या स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींनी नोंदवले आहे. या पार्श्वभूमीवर आता आयोगाने पहिल्यांदाच तृतीयपंथी वर्गातील व्यक्तीची निवडणूक सदिच्छा दूत म्हणून नियुक्ती केली आहे. गौरी सावंत यांच्या नेमणुकीमुळे अधिकाधिक तृतीयपंथीची शेवटच्या टप्प्यातील नावनोंदणी करण्यास मदत होईल. येत्या काही दिवसांत गौरी सावंत या तृतीयपंथी यांच्या घरी जाऊन मतदानाची आवश्यकता, मतदानाचा हक्क या बाबत सांगणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)