सातारा -सातारा शहरातील मंगळवार पेठेतील एका घरात एसी बसवायला गेल्यानंतर चक्क तीन लाखांवर डल्ला मारल्याची घटना दोन दिवसापुर्वी घडली होरती. याप्रकरणी सुवर्णा विश्वास देशपांडे (रा.बालाजी आर्पाटमेंट, मंगळवार पेठ सातारा) यांनी शहरातील अजिंक्य एसी सर्व्हीसेस यांच्या दोन कामगांराच्या विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानंतर सातारा गुन्हे शाखेच्या पथकाने चोरट्याला तात्काळ अटक केली. आप्पा रामन्ना बिल्लेकरी (वय 40 मुळ रा. बागलकोट, सध्या रा. सातारा) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे.
तक्रारदार यांच्या घराजवळ दि.10 रोजी अजिंक्य एसी सर्व्हीसेस या दुकानाचे कामगार एसी फिटींग करण्यासाठी आले होते. त्यावेळी त्या दोन अज्ञात चोरट्यांनी तक्रारदार यांच्या घराच्या बेडरुममधे असलेल्या ड्रेसिंगचा दरवाजा उघडून चोरी केल्याचा संशय तक्रारदारांनी व्यक्त केला होता. चोरट्यांनी पाच तोळे वजनाच्या पाटल्या, तीन तोळे वजनाचे मंगळसुत्र, तीन ग्रॅम सोन्याची अंगठी, दोन तोळे वजनाचे मिनी गंठण, एक तोळे वजनाचे सोन्याचे पेन्डल, चांदीची जोडवी व पैंजण असा सुमारे 3 लाख 83 हजाराचा ऐवज चोरट्यांनी लंपास केल्याची तक्रार शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल झाली होती.
दरम्यान सातारा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सागर गवसणे यांचे पथक शहरातील करंजे भागात गस्त घालत होते. त्यावेळी एक व्यक्ती सोन्याचे दागिने विक्रीसाठी आल्याचे त्यांना बातमीदाराकडून कळाले. पोलीसांनी तात्काळ त्या भागात सापळा लावत आप्पा रामन्ना बिल्लेकरी (वय 40 मुळ रा. बागलकोट, सध्या रा. सातारा) याला ताब्यात घेतला.
त्याच्याकडे अधिक विचारपुड केली तेव्हा त्याने आपण मंगळवार पेठ येथे एसी दुरूस्त करण्यासाठी गेल्यावर चोरी केल्याचे कबुल करून 2 लाख 9 हजाराचे सोन्या चांदीचे दागिने पोलीसांना दिले.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विजय कुंभार यांच्या सुचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक सागर गवसणे, सहाय्यक फौजदार पृथ्वीराज घोरपडे, विलास नागे, पोलीस नाईक मोहन नाचण, योगेश पोळ, नितीन भोसले, राजमकुमार ननावरे, संतोष जाधव, प्रवीण कडव, वैभव सावंत, मयुर देशमुख, निखील जाधव यांनी केली.