राजस्थानात पकडली पगारी चोरांची टोळी; मासिक 15 हजार पगार ! 

जयपूर (राजस्थान): जयपूर पोलीसांनी पगारी चोरांच्या एका टोळीचा पर्दाफाश केला आहे. या टोळीतील चोरांना मासिक 15 हजार रुपये पगार देण्यात येत होता आणि त्या बदल्यात ते चोर आपल्या टोळीच्या म्होरक्‍याला सोनसाखळ्या, पर्स, मोबाईल, दागदागिने आणि अन्य वस्तू चोरून आणून देत होते. 

राजधानी जयपूर (पूर्व) च्या पोलीसांनी या 6 पगारदार चोरांना आणि त्यांना पगार देणाऱ्या त्यांच्या म्होरक्‍याला अटक केली आहे. नंदराम, लाखन, इंद्राज, सलमान, खलील आणि कपिल अशी पगारी चोरांची नावे असून त्यांच्या म्होरक्‍याचे नाव आशीष आहे. आपल्या पगारदार चोरांनी चोरून आणलेला माल आशीष बाजारात विकत असे. त्याचा हा व्यवसाय पोलीसांनी पकडेपर्यंत जोरात चालू होता असे सांगण्यात आले आहे. पोलीसांनी पगारी चोरांच्या या टोळक्‍याकडून 33 मोबाईल्स, 1 लॅपटॉप, 2 सोनसाखळ्या आणि 4 मोटर बाईक्‍स जप्त केल्या आहेत. 


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)