थोरात हायकमांड पेक्षा मोठे आहेत का ? मला पक्षनिष्ठा सांगू नये- विखे पाटील

मुंबई: राधाकृष्ण विखे हे काँग्रेसशी निष्ठावान आहेत का हे? पाहण्याची सर्वांनाच उत्सुकता आहे, असा टोला लगावत बाळासाहेब थोरातांनी राधाकृष्ण विखे पाटलांच्या पक्षनिष्ठेबद्दल सवाल उपस्थित केला होता. दरम्यान, बाळासाहेब थोरात हायकमांड पेक्षा मोठे आहेत का ? असा प्रश्न विखे पाटील यांनी उपस्थित केला.

मला जे सांगायचं आहे ते हायकमांड ला सांगेन. बाळासाहेब थोरात हायकमांड पेक्षा मोठे आहेत का ? मी त्यांना सांगण्याच बांधील नाही. बाळासाहेब थोरात यांच्यकढे कपबशी, नारळ, रोलर कुठून आले हे मला माहित आहे. त्यांनी मला पक्ष निष्ठा सांगून नये

-Ads-

काय म्हणाले होते बाळासाहेब थोरात ?

काँग्रेस पक्षानं विखे-पाटील कुटुंबाला भरभरून दिले. बाळासाहेब विखेंना खासदार, राधाकृष्ण विखेंना मंत्री, विरोधीपक्ष नेते, शालिनीताई विखे यांना जिल्हा परिषद अध्यक्ष केले. त्यामुळं सुजय विखे यांनी भाजपमध्ये प्रवेश करायला नको होता. खरंतर सुजय यांच्या या निर्णयाचा राधाकृष्ण विखे यांनी सर्वप्रथम निषेध करायला हवा.

विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांची पत्रकार परिषद, मुंबई

Posted by Radhakrishna Vikhe Patil on Thursday, 14 March 2019

What is your reaction?
6 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)