‘मुलायम सिंह यादव’ यांचे वय झाले आहे : राबडीदेवी

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच पुन्हा एकदा भारताचे पंतप्रधान व्हावेत अशी इच्छा उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे नेते मुलायम सिंह यांनी व्यक्त केली होती. लोकसभेच्या शेवटच्या सत्रात नरेंद्र मोदी हेच पुन्हा भारताचे पंतप्रधान व्हावेत, अशी मनोकामना प्रकट केल्यानंतर यावर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

दरम्यान, राजदचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांच्या पत्नी असणाऱ्या बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडीदेवी यांनी  मुलायम सिंह यांच्या वक्तव्यावर आपले मत मांडले आहे कि,” त्यांचं (मुलायम ) वय झाले आहे, त्यांना आठवण नाही राहत की, केव्हा काय बोलायचे त्यामुळे त्यांनी जे वक्तव्य केले ते मला महत्वाचे वाटत नाही.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)