निवडणुकीत काय बोलाव ते त्यांनी ठरवावे; मी मैत्रीचा हात कधी सोडत नाही – गडकरी

निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर केल्याने लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजले असून सर्वच राजकीय पक्षांनी लोकसभा निवडणुकांसाठी कंबर कसली आहे. तसेच लोकसभा निवडणुकीचा ज्वर वाढू लागला असताना राजकीय उलथापालथ देखील सुरू झाली आहे. यातच राजकीय नेत्यांनी निवडणुकीत काय बोलाव ते त्यांनी ठरवावं. मी मैत्री केलेल्यांचा हात कधी सोडत नाही. असे म्हणून विरोधी पक्षातील नेत्यांबद्दल केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आपले मत मांडले आहे.

दरम्यान, एक वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये नितीन गडकरी यांनी ‘शरद पवार, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या मुद्द्यांवर भाष्य केले आहे की, राज ठाकरेंचे विचार सुस्पष्ट होते. मी मैत्री केलेल्यांचा हात कधी सोडत नाही. माझे त्यांच्याशी चांगले संबंध आहेत. निवडणुकीत काय बोलाव ते त्यांनी ठरवावे. भाजपा आणि शिवसेनेची युती ही हिंदुत्वाच्या आधारावर आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीची विचारधारा जवळपास समान आहे. परंतु काँग्रेसची विचारधारा आणि राज ठाकरेंची विचारधारा वेगवेगळी आहे. राज आणि राष्ट्रवादीच्या विचारांमध्ये ताळमेळ नाही. विचारांच्या आधारावर युती करावी, राज ठाकरेंनी राष्ट्रवादीची साथ द्यायला नको होती, असे नितीन गडकरी म्हणाले.

What is your reaction?
8 :thumbsup:
0 :heart:
5 :joy:
0 :heart_eyes:
1 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)