महाराष्ट्राच्या ‘या’ 6 नेत्यांना भाजपामध्ये मोठी जबाबदारी

गडकरी, राणे, जावडेकर, गोयल, लोढा आणि सहस्त्रबुध्दे केंद्रीय निवडणूक समितीत

मुंबई:आगामी लोकसभा निवडणुकांसाठी भाजपाने जय्यत तयारी सुरू केली आहे. यासाठी वेगवेगळ्या मुख्य कार्यांसाठी महत्त्वपूर्ण व्यक्तींच्या जबाबदाऱ्याही निश्‍चित झाल्या आहेत. यात महाराष्ट्रातील 6 नेत्यांवर विशेष जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या नेत्यांमध्ये नितीन गडकरी, पीयूष गोयल, प्रकाश जावडेकर, नारायण राणे, मंगल प्रभात लोढा आणि विनय सहस्त्रबुद्धे यांची नावे आहेत. भाजपाच्या केंद्रीय कार्यालयाने लोकसभा निवडणूक अभियानाच्या विविध समित्यांची ही सूची जाहीर केली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

लोकसभा निवडणुकीच्या जबाबदाऱ्यांसाठी भाजपाने अनेक समित्या बनवल्या आहेत. त्यात पक्षाचे संकल्पपत्र समितीमध्ये (निवडणूक घोषणापत्र समिती) महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना मुख्य स्थान मिळाले आहे. राणेंसह रेल्वे मंत्री पीयूष गोयलसुद्धा संकल्पपत्र समितीमध्ये आहेत. केंद्रीय रस्ता वहन मंत्री नितीन गडकरींना सामाजिक व स्वयंसेवी संघटना संपर्क समितीत, तर राज्यसभा सदस्य विनय सहस्त्रबुद्धे यांना साहित्य निर्माण समितीमध्ये घेण्यात आले आहे.

याशिवाय केंद्रीय मनुष्यबळ विकास प्रकाश जावडेकर यांना प्रबुद्ध संमेलन समितीत घेतले गेले आहे. महाराष्ट्रातील ज्येष्ठ आमदार मंगल प्रभात लोढा असे एकमेव नेते आहेत ज्यांना दोन समित्यांमध्ये स्थान दिले गेले आहे. लोढा यांना लोकसभा निवडणुकीमध्ये प्रवास व विमान समिती तसेच लाभार्थी संपर्क समितीमध्ये स्थान मिळाले आहे. या सूचीत माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे नाव भुवया उंचावणारे आहे. ते भाजपाच्या कोट्यातून राज्यसभेवर गेलेले सदस्य आहेत.

आपल्या निवडणूक अभियान टीममध्ये राणे, गडकरी, गोयल, जावडेकर, सहस्त्रबुद्धे आणि लोढा अशांना लोकसभा निवडणुकीचे व्यवस्थापन, प्रचार व संचालनमध्ये दिग्गज असलेल्या नेत्यांना स्थान देऊन भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी यावेळी लोकसभा निवडणूक किती भक्कम प्रकारे लढवली जाईल, हेच दर्शवले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)