लोकसभा निवडणुकीच्या पार्श्र्वभूमीवर सत्ताधारी पक्ष आणि विरोधक यांच्या मध्ये जोरदार आरोप प्रत्यारोप होत आहेत. त्यामुळे देशातील वातावरण चांगलेच तापले आहे. सर्वच पक्षांचे नेते एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडायला तयार नाहीत. त्यामुळेच काही नेत्यांकडून वादग्रस्त वक्तव्य केली जात आहेत. अशातच आता कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि जनता दल धर्मनिरपेक्ष नेते एच डी कुमारस्वामी यांनी मोदींवर वैयक्तिक टीका केली आहे.
मोदी दररोज सकाळी उठतात, चेहऱ्यावरील तेज राखण्यासाठी मेकअप किंवा वॅक्स करतात आणि मग कॅमेरासमोर बसतात, असे वक्तव्य कुमारस्वामी यांनी केले आहे. आम्ही सकाळी एकदाच स्नान करतो आणि केवळ पुढच्या दिवशी आपला चेहरा धुतो, त्यामुळे आमचे चेहरे कॅमेरासमोर चांगले दिसत नाहीत. म्हणूनच मीडिया केवळ मोदींनाच दाखवत असल्याची टीका कुमारस्वामी यांनी केली आहे.
Karnataka CM HD Kumaraswamy: Modi wakes up every morning, applies makeup or wax to get a shine on his face&sits in front of cameras. But we take bath once in the morning & wash our face only the next day. Our faces don’t look good on cameras. That’s why even media shows only Modi pic.twitter.com/0h93gcsM4P
— ANI (@ANI) April 9, 2019