उप.विभागीय पोलीस अधिकारी कु. प्रेरणा कट्टे यांचे भाजपा महिला आघाडीस आश्वासन
कोल्हापूर: राजारामपुरी पोलीस स्टेशनमध्ये अल्पवयीन मुलीचा जबाब घेतेवेळी चेतन दिलीप घाटगे या पोलीस कर्मचा-याने सदर मुलीचा विनयभंग केला. कायद्याचे रक्षण करणारेच कायदा हातात घेऊ लागल्यावर रक्षकच बनला भक्षक असे म्हंटलयास वावगे ठरणार नाही. ही बाब अत्यंत घृणास्पद असून यामुळे संपूर्ण शहरातील महिलांच्या भावना दुखावल्या आहेत.
म्हणून आज भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्यावतीने उप विभागीय पोलीस अधिकारी कु प्रेरणा कट्टे यांना निवदेन देण्यात आले की, माणसातील या नराधमाला कठोरात कठोर शिक्षा होऊन त्याला ताबडतोब पोलीस खात्यातून बडतर्फ करावे अशी मागणी करण्यात आली. या निवेदनाला उत्तर देताना कु प्रेरणा कट्टे म्हणाल्या, सदर घटना अतिशय निंदनीय असून पोलीस कर्मचारी चेतन घाटगेवर तात्काळ गुन्हा दाखल केला असून समाजाच्या भावनांचा विचार करून या पोलीस कर्मचा-यास कायमचे बडतर्फ करण्यात येईल व त्याला कठोर शासन होण्यासाठी अधिक-अधिक प्रयत्न केले जातील असे आश्वत केले.
याप्रसंगी भाजपा महिला आघाडी आध्यक्ष सौ.वैशाली पसारे, जिल्हा उपाध्यक्ष सौ. भारती जोशी, सरचिटणीस सुनिता सूर्यवंशी, उपाध्यक्ष विजयमाला जाधव, चिटणीस प्रमोदनी हर्डीकर, प्रदेश सदस्या किशोरी स्वामी, चिटणीस शारदा लोहार, गायत्री राऊत आदी कार्यकर्त्या उपस्थित होत्या.