अमेरिकेत शटडाऊन संपण्याचे लक्षण नाही ; सिनेटने दोन्ही ठराव फेटाळले

file photo

वॉशिंग्टन (अमेरिका): अमेरिकेत 22 डिसेंबरपासून चालू असलेला आंशिक शटडाऊन समाप्त होण्याचे कोणतेही लक्षण दिसत नाही. त्या संबंधात मांडण्यात आलेले दोन्ही ठराव सिनेटने फेटाळून लावले आहेत. सत्ताधारी रिपब्लिकन आणि विरोधी डेमॉक्रेटिक या दोन्ही पक्षांनी शटडाऊन समाप्त करण्याच्या दृष्टीने एक-एक ठराव मांडला होता.

कोणताही ठराव मंजूर होण्यासाठी 60 मतांची आवश्‍यकता होती. मात्र रिपब्लिकन पक्षाच्या ठरावाला 50-47 आणि डेमॉक्रेटिक पक्षाच्या ठरावाला 52-44 अशी मते पडली. कोणताही ठराव मंजूर न झाल्याने जैसे थे स्थिती बनली आहे.
22 डिसेंबरपासून चालू असलेला हा शटडाऊन अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मोठा शटडाऊन आहे. या शटडाऊनमुळे अनेक सरकारी विभागांचे कामकाज ठप्प झाले आहे, आणि सुमारे आठ लाख कर्मचाऱ्यांना एका महिन्यापासून पगार मिळालेला नाही.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अध्यक्ष डोनॉल्ड ट्रम्प मेक्‍सिको सीमेवरील भिंतीसाठी 5.7 अब्ज डॉलर्सच्या मागणीवर अगदी ठाम आहेत. त्या शिवाय अन्य कोणत्यीही बिलावर आपण सही करणार नसल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. उलटपक्षी विरोधी पक्षही त्यांची मागणी न मानण्यावर ठाम आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)