# व्हिडीओ : माझ्या पत्नीनं राष्ट्रवादी काँग्रेसमधून निवडणूक लढवली तरी… – महसूलमंत्री

संग्रहित छायाचित्र

कोल्हापूर – समजा माझ्या पत्नीनं उद्या राष्ट्रवादी काँग्रेसमधून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली तरी मी शिवसेनेच्याच उमेदवाराचा प्रचार करणार, असे वक्तव्य राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले आहे. ते आज कोल्हापूरच्या मुरगूडमधील शिवसेना-भाजपच्या मेळाव्यात बोलत होते.

कोल्हापूर लोकसभा मतदार संघ हा शिवसेनेच्या वाट्याला आला आहे. त्याठिकाणी शिवसेनेचे संजय मंडलिक लोकसभा लढवणार आहेत. सेना-भाजपची युती झाल्यानंतरही चंद्रकांत पाटील हे राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक यांना मदत करतील अशी चर्चा सुरु झाली. मात्र या सगळ्या चर्चेला आज दादांनी उत्तर देऊन शांत केले. महाडिक यांच्यासोबतची मैत्री वगैरे बाजूला आधी युतीचा धर्मपाळला जाणार असंही वक्तव्य दादांनी केले आहे. शिवाय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न साकार करण्यासाठी संजय मंडलिक यांना विजयी करण्याचं आवाहन दादांनी उपस्थितांना केले.

https://youtu.be/vM_QnQl-Z3E

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)