‘पर्रिकरांच्या जागी दुसरा मुख्यमंत्री नेमण्याचा प्रश्‍नच नाही !’

File photo...

पणजी: गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या जागी दुसरा मुख्यमंत्री नेमण्याचा विषयच आमच्यापुढे नाही असे गोवा फॉरवर्ड पार्टीचे प्रमुख विजय सरदेसाई यांनी म्हटले आहे.

सरदेसाई हे पर्रिकर यांच्या मंत्रिमंडळात विद्यमान कृषी मंत्री आहेत. पर्रिकर हे प्रकृती अस्वास्थ्यतेमुळे गेले काही दिवस आजारी आहेत त्यांना कामकाज बघणे अशक्‍य बनल्याने त्यांच्या जागी पुर्णवेळ मुख्यमंत्री नेमण्याची मागणी कॉंग्रेसने केली आहे. तथापि सरदेसाई यांनी त्यांची ही मागणी धुडकाऊन लावली आहे. त्यांच्या आजारपणामुळे गोव्याचे प्रशासन ठप्प झाल्याची कॉंग्रेसची तक्रार असली तरी भाजपने मात्र मुख्यमंत्री हे त्यांच्या निवासस्थानातून राज्याचे प्रशासकीय कामकाज चालवत असल्याचे म्हटले आहे.

गोवा सरकारमध्ये घटक पक्ष म्हणून काम करणाऱ्या गोवा फॉरवर्ड पार्टीनेही त्यांना बदलण्याची मागणी आज अमान्य केल्याने पर्रिकर यांना अजूनही बदललेले जाणार नसल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. आज पीटीआयशी बोलताना सरदेसाई म्हणाले की 28 नोव्हेंबर रोजी चित्रपट महोत्सवाच्या सांगता समारंभानंतर मी परतत असताना मुख्यमंत्र्यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. त्यांची प्रकृती आता उत्तम आहे त्यामुळे त्यांना बदलण्याचा प्रश्‍नच येतो कोठे असा सवाल त्यांनी केला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)