राजुरीत महामार्गावर गतिरोधक बसवावेत 

आळेफाटा- कल्याण-अहमदनगर महामार्गावर राजुरी (ता. जुन्नर) गावच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात अपघातांचे प्रमाण वाढल्याने या महामार्गावर ठीक ठिकाणी गतिरोधक बसविण्यात यावेत, अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने सरपंच संजय गवळी गणेश दूध संस्थेचे चेअरमन गोविंद औटी, सचिव डी. एम. औटी यांनी केली आहे.

मुंबई कल्याण ते विशाखापट्टणम्‌ हा लांब पल्ल्याचा राष्ट्रीय महामार्ग असल्याने या महामार्गावरून वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. राजुरी हे गाव या महामार्गालगत आहे. तसेच महामार्गाच्या लगतच गणेश सहकारी दूध उत्पादक संस्था, स्मशानभूमी व बसस्थानक आहे. मोठ्या संख्येने दूध उत्पादक शेतकरी व ग्रामस्थ नेहमीच या महामार्गावरून ये-जा करीत असतात. शालेय विद्यार्थ्यांना हा महामार्ग ओलांडून शाळेत जाताना जाताना तर जीव मुठीत धरून जावे लागते; परंतु या ठिकाणी महामार्गावर गतिरोधक नसल्यामुळे वाहने धरधाव वेगाने जा- ये करत असतात. या गावाजवळ दोन मोठी वळणे आहेत. त्यामुळेही नेहमीच अपघात घडतात.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

ग्रामपंचायतीने या संदर्भात वारंवार संबंधित राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे गतिरोधक बसविण्याची पत्राद्वारे मागणी करून रास्ता रोको आंदोलनाचाही इशारा देण्यात आला होता. या पत्राची एक प्रत स्थानिक आमदार शरद सोनवणे यांना देण्यात आली होती. आता आमदार शरद सोनवणे यांनीच या संदर्भात लक्ष घातले असून येत्या आठ दिवसांच्या आत महामार्गावर या ठिकाणी गतिरोधक बसविण्याच्या सूचना संबंधित विभागाला त्यांनी दिल्या आहेत, असे सरपंच संजय गवळी यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)