पुणे – ऑडिटशिवाय नवीन बाकडे नको

सजग नागरिक मंचाची मागणी

पुणे – गेल्या वर्षात नगरसेवकांच्या आग्रहापोटी तब्बल 15 कोटी रुपये खर्च करून 25 हजार बाके शहरात बसविली. बाके कोठे बसविली, त्याचे काय झाले, याचे ऑडिट होईपर्यंत कोणत्याही नवीन बाकड्यांची खरेदी करू नये, अशी मागणी सजग नागरिक मंचाने महापालिका आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे.

विविध नगरसेवकांच्या मागणीवरून शहरभरात बसविण्यासाठी लोखंडी बाके खरेदीचा प्रस्ताव प्रशासनाने स्थायी समिती बैठकीत ठेवला आहे. या खरेदीसाठी मनपा रुपये 5,598 प्रति नग या भावाने तब्बल 4 कोटी रुपये खर्च करणार आहे. प्रत्यक्षात गेल्या 5 वर्षांत एवढ्या मोठ्या प्रमाणात बाकडे बसविलेली असताना, पुन्हा नव्याने 7 हजार बाकडे बसविण्याचे कारण काय? असा सवाल मंचाने उपस्थित केला आहे. त्यामुळे 5 गेल्या वर्षांत शहरभरात बसविलेल्या बाकांचा सद्यस्थिती अहवाल घेतल्याशिवाय नव्याने निवेदेला मंजुरी देऊ नये, अशी मागणी मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर, विश्‍वास सहस्रबुद्धे यांनी केली आहे.

खासगी सोसायट्या, गुऱ्हाळात बाकडे
महापालिकेने गेल्या पाच वर्षांत खरेदी करण्यात आलेल्या या बाकडांचे नेमके काय झाले याचा कोणताही हिशेब नाही. नगरसेवकांच्या वॉर्डस्तरीय निधीतून ही बाकडे खरेदी करण्यात आलेली असल्याने या खरेदीनंतर प्रशासनाकडून ती नगरसेवकाच्या ताब्यात देण्यात आली. तर अनेक नगरसेवकांकडून ती आपल्या परिसरातील सार्वजनिक मंडळे, खासगी सोसायट्यांना देण्यात आली आहेत. तर काही भागात उसाची गुऱ्हाळे, चायनीज हातगाड्या, हॉटेलमध्ये दिसून आली आहेत. तसेच महापालिकेकडूनही सध्या शहरात प्रमुख रस्त्यावर स्मार्ट स्ट्रीट अंतर्गत नव्याने पदपथ करण्यात येत असून त्यावरही आकर्षक बाकडे साकारण्यात आली आहेत. त्यामुळे नवीन खरेदी कशासाठी? असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)